कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ३८ हजार ग्राहकांना नोटिस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ३८ हजार ग्राहकांना नोटिस

महालोकअदालतीच्या माध्यमातून तडजोड करण्याचे महावितरणचे आवाहन

अहमदनगर: कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या  महावितरणच्या अहमदनगर  मंडळातील   एकूण ३८ हजार ९७९  ग्राहकांना जिल्हा व तालुका  विधी सेवा प्राधिकरण य

अल्पवयीन मुलीला मुंबईला पळवून नेत तिच्यावर अत्याचार
 मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 75 रुग्णांनी घेतला लाभ
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : पुणे विभाग-एक दृष्टीक्षेप

अहमदनगर: कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या  महावितरणच्या अहमदनगर  मंडळातील   एकूण ३८ हजार ९७९  ग्राहकांना जिल्हा व तालुका  विधी सेवा प्राधिकरण यांचे माध्यमातून नोटीस देण्यात आल्या असून  आज शनिवार ७ मे २०२२  रोजी   अहमदनगर जिल्ह्यातील  न्यायालयांमध्ये होणाऱ्या  राष्ट्रीय महालोकअदालत मध्ये तडजोडीच्या  माध्यमातून व  विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत सहभाग घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे  आवाहन महावितरणने केले आहे.  

थकबाकीमुळे  कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसूलीसोबतच ग्राहकांना लाभ व सवलत मिळेल या हेतूने विलासराव देशमुख अभय  योजना जाहीर केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत  थकबाकी असणाऱ्या व त्यामुळे  कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित  ग्राहकांकडील  थकबाकीचा भरणा करून  सवलतीसोबतच पुनर्रजोडणीची संधी मिळणार आहे. या योजनेत थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीची  मूळ रक्कम भरावी  लागेल, त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील  व्याज व विलंब आकार १००% माफ करण्यात येइल. जर थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५% व लघुदाब ग्राहकांना १०% थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळेल. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून तसेच या योजनेचा लाभ संबंधित ग्राहकांनी घेऊन थकबाकीमुक्त व्हावे  असे आवाहन महावितरणने केले आहे. 

COMMENTS