Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेसेना नसून शिल्लकसेना

उपमुख्यमंत्री फडणवीसांची जहरी टीका

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार यात कोणतीही शंका नाही, मात्र सध्या कर्नाटकमधील भाजपच्या पराभवाची चर्चा होत अहे. मात्र ज्य

ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात राज्यपाल बदलाचे वारे

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार यात कोणतीही शंका नाही, मात्र सध्या कर्नाटकमधील भाजपच्या पराभवाची चर्चा होत अहे. मात्र ज्यांची एकही जागा निवडून आली नाही. ते बडवत आहेत, ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही ते देखील आनंद साजरा करत आहेत, मात्र त्या शिल्लकसेनेने आपल्याजवळ किती संख्याबळ राहिले ते तपासावे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उपमुख्यमंत्री फडणवीस गुरूवारी पुणे दौर्‍यावर होते. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप कार्य समितीची बैठक झाली. यानंतर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना संबोधित करतांना ते बोलत होते. उद्धव ठाकरे गटाने केलेल्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या नाहीत, त्यामुळे हे सरकार संविधानिक आहे. राजीनामा देतो आणि देणे यातील फरक शरद पवारांनी ठाकरेंना सांगितला. राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न लागू करणार असे काहीजण सांगत आहेत. मात्र अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करुन महाराष्ट्रात जिंकता येणार नाही. महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न आणि भाजप पॅटर्न. फडणवीस म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम आहे. आपला निवडून येण्याचा फार्म्युला मोदीजींची कार्यशैली, सामान्यांच्या विकासाचा आपला नरेटीव्ह आहे. मनसुख हिरेन यांची हत्या उघड करुन आम्ही मविआचे वसुली रॅकेट बंद केले असा दावाही त्यांनी केला.

विधानसभेत 200 हून अधिक जागा जिंकू ः बावनकुळे – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार असून 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र, जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. शिल्लक सेना ही ‘किंचित सेना’ होईल, या भीतीनेच ठाकरे गटाकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टीका होत असल्याची टीपण्णी त्यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत 48 जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून 51 टक्के मते मिळविण्याचा भाजपचा निर्धार आहे. विधानसभेत 200 हून अधिक जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. भाजपची बैठक निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून 2024 मधील निवडणुकांसाठी हा महासंकल्प असेल. केंद्राच्या योजना पोहोचविण्यासाठी ‘घर घर अभियान आणि शिंदे फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत केला जाईल. असेही ते म्हणाले.

COMMENTS