Homeताज्या बातम्यासंपादकीय

नरकातील स्वर्ग नव्हे, स्वर्गातील गरळ !

राजकारणामध्ये अंतर्गत घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात घडत असतात आणि हा राजकारणाचा धर्मही आहे. कारण, राजकीय व्यक्तिमत्वाला अनेक चढउतारांना सामोरे जावं

निळवंड्याच्या कथित तारणहाराला उशिरा का होईना उपरतीः विखे
रावसाहेब घोडके” संविधान गुणगौरव” राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 
एका मतासाठी थेट सिंगापूर ते वाशीम प्रवास

राजकारणामध्ये अंतर्गत घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात घडत असतात आणि हा राजकारणाचा धर्मही आहे. कारण, राजकीय व्यक्तिमत्वाला अनेक चढउतारांना सामोरे जावं लागतं. त्यांच्या जीवनात नाटकीय घडामोडी निश्चितपणे होतात; परंतु, याच राजकीय संबंधांचे भांडवल करत गौप्यस्फोटाचा आव आणणारे आणि उद्धव ठाकरे यांचे पोपट असलेले संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पोतडीछाप पुस्तकातून काही गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विषयी करणार असल्याचं ते सांगत फिरत आहेत. प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे देखील तुरुंगात गेले होते. त्यांना कोणत्याही राज्यातील नेत्यापेक्षा ईडीच्या कोठडीत जास्त काळ राहावे लागले नाही. यामागेही त्यांचे राजकीय संबंध कामाला आले असतील. त्यामुळे, हे जसं त्यांच्याविषयी वास्तव आहे, तसं नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजरातच्या सत्तेवर असताना तत्कालीन केंद्र सरकारने त्यांच्या विरोधात ज्या काही बाबी केल्या असतील, त्याविषयी आता गौप्यस्फोट करून नेमकं काय साध्य करू पाहत आहेत? हे मात्र आश्चर्य आहे. त्यातच, राज्याचे जाणते नेते शरद पवार हे या पुस्तकाचे उद्घाटन करणार आहेत. संजय राऊत हे नेमकं मोदी आणि शहा यांना शरद पवार यांचीच मोठी मदत झाली, असं बरळत आहेत. त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांची देखील त्यांना  मोठी मदत झाली, असं मोठ्या अविर्भावात सांगत आहेत. परंतु, राजकारणामध्ये अंतर्गत संबंध एकमेकांना पूरक ठरतात आणि त्या संबंधांचा उपयोग एकमेकांसाठी करावा लागतो. आता उत्तर प्रदेशचं आपण जर उदाहरण पाहिलं, तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या राजकीय सत्तायुतीमधून घडविण्यात आलेला गेस्ट हाऊस कांड, यामध्ये त्या काळी मायावती यांना जर कोणी वाचवलं, तर ते भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी. त्यांनी थेट आपल्या उत्तर प्रदेशातील आमदार आणि कार्यकर्त्यांना फोन करून प्रत्यक्ष मदत केली. देशाचे पंतप्रधान ते असताना ह्या घटनेतून मायावती यांना वाचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. देशात अनेक राजकीय व्यक्तींच्या संदर्भात अशा घडामोडी घडत असतात. परंतु, त्यांचा भूतकाळ गेल्यानंतर करायचा नसतो. त्या गोष्टी भूतकाळाच्या असतात आणि भूतकाळा बरोबर त्या सोडून द्यायच्या असतात. याचे साधे भान गेल्या कित्येक वर्षाच्या राजकारणामध्ये संजय राऊत यांना आलेलं नाही. वास्तविक राजकारणामध्ये संजय राऊत हे शिवसेनेचे असल्याने शिवसेनेच्या मुखपत्रातील लिहीत असले तरी, प्रत्यक्षात त्यांचा राजकीय जो संबंध आहे तो खासकरून शरद पवारांशी आहे. म्हणजे शिवसेनेतील शरद पवारांचा माणूस कोण असा जर साधा उल्लेख केला, तर त्याचे एकमेव उत्तर मिळतं ते म्हणजे संजय राऊत. राजकारणातल्या या बाबींचा गौप्यस्फोट करणं हे काही चांगलं लक्षण नाही! कदाचित, एक लेखक म्हणून त्या पुस्तकाला मागणी यावी यासाठी, त्यांची व्यावसायिक बाजू जोपासताना, असे प्रकार करणे आपण समजू शकतो. परंतु, राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या- जे हल्ली वर्तमान काळात -आपल्या राजकीय संघर्षातून जात आहेत,  त्यांच्याविषयी अशी विधाने करणे, हे काही नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे संजय राऊत हे नरकातला स्वर्ग जरी सांगत असले तरी, प्रत्यक्षात तो गरळ ओकण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत असताना, “नरकातला स्वर्ग’ असं जरी त्यांनी पुस्तकाचं नाव ठेवलं असतं तरी, प्रत्यक्षात राऊत यांच्या  या पुस्तकाला फार काही महत्त्व नसेल, हे मात्र निश्चित आहे.

COMMENTS