Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्तर पश्‍चिम मुंबई मतदारसंघ पुन्हा चर्चेत

मतमोजणीत हेराफेरी झाल्याची अपक्ष उमेदवारांची पोलिसांत तक्रार

मुंबई ः मुंबई उत्तर पश्‍चिम मतदारसंघातील लोकसभा निवडणूक अनेक कारणांमुळे गाजल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा शिंदे गटा

मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचे निधन
मणिपूरमध्ये शस्त्रास्त्रे लुटण्याचा प्रयत्न
राज्यात दहीहंडीला परवानगी नाहीच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई ः मुंबई उत्तर पश्‍चिम मतदारसंघातील लोकसभा निवडणूक अनेक कारणांमुळे गाजल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी पराभूत केले होते. मात्र या निकालात  मोठी हेराफेरी झाली असून मतमोजणीदरम्यान गैरप्रकार झाला असा, आरोप ठाकरे गटाने केला होता. यानंतर दोन अपक्ष उमेदवारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, मात्र पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद केलेली नाही.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, या निवडणुकीत उमेदवार असलेले  हिंदू समाज पक्षाचे भरत शाह आणि भारत जनआधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून याप्रकरणी 8 दिवस उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याबाबतची नाराजी तक्रारदारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात पार पडली. मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असताना रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंदरकर आणि मुलगी दीप्ती यांच्याकडून मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याचे शहा आणि आरोरा यांच्या लक्षात आले. त्यांनी या दोघांनाही मोबाईल वापरण्यापासून रोखले. तसेच ही बाब आरओ वंदना सूर्यवंशी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. मात्र, त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितल्यानंतर शहा आणि आरोरा या दोघांनी वाईकर यांच्या मेव्हण्याला वनराई पोलिस ठाण्यात घेऊन गेले. मात्र, त्या ठिकाणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल न करता फक्त तक्रार दाखल करून घेतली. याबाबत अद्याप निवडणूक अधिकार्‍यांनी आपला अहवाल पोलिसांकडे पाठवला नाही, असा आरोपही तक्रारदार यांनी केला.

COMMENTS