मुंबई/प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मी बुधवारी भेट घेतली. या भेटीत अनेक चर्चा झाल्या. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. भाजप ज्या
मुंबई/प्रतिनिधी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मी बुधवारी भेट घेतली. या भेटीत अनेक चर्चा झाल्या. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. भाजप ज्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर आम्ही कधीही गेलो नाही. आरएसएस आणि भाजप विरोधातील भांडण व्यवस्थेविरोधात आहे. भाजप आणि मित्र पक्षांबरोबर कोणताही समझोता नाही. जर शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
अॅड. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल, बुधवारी रात्री बंद दाराआड अडीच तास बैठक झाली आहे. बैठकीत राजकीय चर्चा झाली असून आंबेडकरांनी ठाकरे गटासोबत युती करू नये, असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसरीकडे आंबेडकर हे ठाकरे गटासोबतच्या युतीवर ठाम आहेत. याआधी 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मला फोन आला होता. मुख्यमंत्र्यांना भेटायला या. म्हणून मी गेलो. भेटीदरम्यान इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत भेट घेतली. भेट देऊन प्रतिकृती बरोबर आहे की नाही ते पाहावे. यावरी चर्चा झाली.
युती कधी करायची, उद्धव ठाकरेंनी ठरवावे – शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलतांना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेसोबत आमची चर्चा झाली आहे. कुणी किती जागा लढवायच्या यासंदर्भात देखील आम्ही बोललो आहोत. मात्र युती ही चार भिंतीत झाली आहे, ती सार्वजनिक कधी करायची ते उद्धव ठाकरेंनी ठरवावे असे स्पष्ट मत अॅड. आंबेडकर यांनी मांडले. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना जे करायचं असेल ते त्यांना ठरवायचं आहे. आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत हे मी उघडपणे सांगत आहे. आमची युती झाली पण पब्लिक कमिटमेंट नाही झाली. चार भिंतीमध्ये युती कधी जाहीर करायची हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आमचा खिमा केला आहे. काँग्रेस आणि शरद पवारांना ओळखणारा माझ्यासारखा दुसरा नेता नाही. शिवसेनेला काँग्रेस फसवेल त्यामुळे त्यांनी अधिक वेळ थांबू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
COMMENTS