नगर (प्रतिनिधी)- शहराजवळील इसळक गावाचे सरपंच छाया संजय गेरंगे व उपसरपंच शोभा चंदू खामकर यांच्यावर सात सदस्यांनी विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर केला ह
नगर (प्रतिनिधी)- शहराजवळील इसळक गावाचे सरपंच छाया संजय गेरंगे व उपसरपंच शोभा चंदू खामकर यांच्यावर सात सदस्यांनी विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर केला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठने सरपंच व उपसरपंच यांना पुन्हा काम करण्यास मान्यता देऊन स्थगिती दिलेली आहे.
याविषयी संजय गेरंगे पाटील म्हणाले की, दि. 28 मार्च 2023 रोजी सात ग्रामपंचायत सदस्य यांनी मिळून सरपंच व उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला होता. परंतु या वेळी दोन सदस्य सभेस गैरहजर राहिल्याने हा विश्वास ठराव रद्द झाला होता.
परंतु पुन्हा नव्याने दोन वर्षानंतर विकास कामात अडथळा आणण्याचा हेतूने पुन्हा अविश्वास ठराव मंजूर करण्याच्या केविलवाना प्रयत्न ग्रामपंचायत सदस्यामुळे घेण्यात आला होता. कुठलाही ग्रामपंचायत कामांचा आढावा न घेता केवळ प्रसार माध्यमांसमोर अविश्वास ठराव घेत असताना विकास कामे होत नसल्याचा खोटा ठराव घेतला होता.
ठराविक ग्रामपंचायत सदस्य हे टक्केवारीप्रमाणे कामे करण्याच्या उद्देशाने होते मात्र सरपंच व उपसरपंच यांनी यांना खतपाणी न घालता योग्यरीत्या व उत्तम दर्जेदार कामे करून घेतली व विरोधकांना व ग्रामस्थांना संपूर्ण विकास कामे केलेले ची माहिती देत गावात केलेले सर्व विकासकामे जवळपास पाच कोटी रुपयांचा विकास कामे गावात झाली आहेत असल्याची माहिती सरपंच यांच्याकडून देण्यात आली.
ज्या सात सदस्यांनी अविश्वास ठराव घेतला होता त्याच्यातील 3 सदस्य विकास कामात टक्केवारीची वारंवार मागणी करून हट्ट धरून बसलेले होते. विकास कामांना अडथळा निर्माण करणारे व गावचा विकास स्वतःच्या स्वार्थासाठी गहाण ठेवणाऱ्या काही निवडक सदस्यांना याही वेळी अपयश आले हे खूप मोठे त्यांचे दुर्दैव.
सरपंच छाया गेरंगे व उपसरपंच शोभा खामकर यांनी राहिलेल्या कार्यकाळात खूप चांगल्या प्रकारे काम करून दाखवण्याचा शब्द दिला असुन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी अविश्वास ठरावास स्थगिती दिल्याने इसळक ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच छाया गिरंगे व उपसरपंच शोभा खामकर यांचा सत्कार करताना संदीप गिरंगे, अरविंद बेरड, भाऊसाहेब गायकवाड, पोपट खामकर, दत्तात्रय गेरंगे, जालिंदर चव्हाण, आमले आप्पा, अशोक गेरंगे, गोरख गेरंगे, शिवाजी खामकर, महादेव गवळी, यशराज शिंदे, विठ्ठल पोमन, गणेश चव्हाण, रंजनदास गेरंगे, विठ्ठल गेरंगे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


COMMENTS