Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशांत कोरटकरला जामीन नाहीच : कोर्टाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

कोल्हापूर : येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी क

सीमावर्ती भागातील गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा
हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
कल्याण येथील विशाल गवळीवरील गुन्हा दाखल प्रकरणी पोलीस विभागाकडून हलगर्जीपणा नाही : गृह राज्यमंत्री योगेश कदम

कोल्हापूर : येथील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे कोरटकर यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. आता त्यांच्यापुढे पोलिसांपुढे शरण येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत कोरटकर यांच्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावल्याचा आरोप आहे. स्वतः सावंत यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. त्यांनी त्याची ऑडिओ क्लिपही सार्वजनिक केली होती. तेव्हापासून चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रशांत कोरटकर फरार झाला होता.

COMMENTS