Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन जाधव-पाटील; उपाध्यक्षपदी अनिल देसाई बिनविरोध

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडणूकीसाठी बँकेच्या संचालक मंडळाची सभा प्राधिकृत अधिकारी,

एफआरपीप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक स्थानबध्द
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशपातळीवरील 4 सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी “या” करा उपाययोजना

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडणूकीसाठी बँकेच्या संचालक मंडळाची सभा प्राधिकृत अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा मनोहर माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
अध्यक्ष पदांसाठी नितीन जाधव-पाटील यांचे नांव आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुचित केले. त्यास ना. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी अनिल देसाई यांचे नांव ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुचित केले. त्यास राजेंद्र राजपुरे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आला होता. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदी नितीन जाधव-पाटील व उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी मनोहर माळी यांनी जाहीर केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, ना. शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद जाधव-पाटील, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दत्तात्रय ढमाळ, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर, प्रदीप विधाते, सत्यजित पाटणकर, शेखर गोरे, ज्ञानदेव रांजणे, रामराव लेंभे, सुरेश सावंत, लहुराज जाधव, सुनील खत्री, सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील यांच्यासह प्राधिकृत अधिकारी मनोहर माळी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांच्यासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीमध्ये सहकार्य केल्याबद्दल बँकेच्यावतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी प्राधिकृत अधिकारी मनोहर माळी व त्यांच्या सहकार्‍यांचे आभार मानले.

COMMENTS