Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत निशिकांतदादा स्पोर्ट्स फाउंडेशन संघास विजेतेपद

इस्लामपूर / प्रतिनिधी : कोल्हापूर येथील लाईन बाजार हॉकी मैदानावर पद्मा पथक आयोजित राष्ट्रीय हॉकी खेळाडू अनिल सावंत स्मृती चषक राज्यस्तरीय हॉकी स्

वरकुटेच्या मुली सलग दुसर्‍यांदा कबड्डीत राज्यात अव्वल; चार मुलींची राज्याच्या संघात निवड
राजस्थानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर !
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा

इस्लामपूर / प्रतिनिधी : कोल्हापूर येथील लाईन बाजार हॉकी मैदानावर पद्मा पथक आयोजित राष्ट्रीय हॉकी खेळाडू अनिल सावंत स्मृती चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत इस्लामपुरातील निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन इस्लामपूर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात निशिकांत दादा स्पोर्टस फौंडेशन इस्लामपूर या संघाने शाहू फाउंडेशन संघावर 1-0 ने मात केली. विजेत्या संघाचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी हॉकी असोसिएशन कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, स्वाती येवलुज, माधुरी जाड, सचिन पाटील, राजेंद्र इनामदार, महंमद शेख, सागर येवलूज, बाळू माने, गणेश पवार, विशाल सावंत उपस्थित होते.
अंतिम सामन्यात पूर्वार्धात 14 व्या मिनिटास निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या विश्‍वजीत पाटील या खेळाडूने दिलेल्या पासवर दिग्विजय कळसे याने मैदानी गोल करत एक गोल अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात शाहू संघाला संपूर्ण वेळेमध्ये एकही गोल करता आला नाही. पहिल्या उपांत्य सामन्यात शाहू फाउंडेशन संघाने कोल्हापूर पोलीस संघाचा 21 गोलने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरा उपांत्य सामना निशिकांत दादा स्पोर्ट्स फाऊंडेशन विरुध्द महाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. सामन्यात वेळ संपल्याने रॉकेटचा वापर केला. यामध्ये निशिकांतदादा स्पोर्टस फौंडेशनकडून स्वप्निल पाटील गणेश बिराजदार व अक्षय जाधव या खेळाडूंनी कॉल करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या आणि श्रीकांत दादा स्पोर्ट्स फाऊंडेशन या हॉकी संघाला रोख रुपये 15000 व द्वितीय फाउंडेशन हॉकी संघात रोख रुपये 10000 व दोन्ही संघात कायम चषक देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले .
यावेळी निशिकांतदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन हॉकी संघाच्या खेळाडूंच्या यशाबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सर्व खेळाडूंचे प्रशिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. पंच म्हणून संदीप जाधव, ओमकार कावरे, दीपक पाटील, राहुल गावडे, धीरज पाटील, सागर जाधव, दत्ता पाटील, अभिजीत पाटील, निसार महालदार, आदित्य भोसले, संजय डोंगरे यांनी काम पाहिले.
या सामन्यातील बेस्ट गोलकीपर ऋषिकेश कल्कुटकी, बेस्ट बॅक रोहन पाटील, बेस्ट हाफ पार्थ पाटील, बेस्ट फॉरवर्ड पृथ्वीराज साळुंखे, मॅन ऑफ द मॅच सागर पाटील, उद्योन्मुख खेळाडू रेहान शेख, स्पर्धेतील मालिकावीर स्वप्नील कुराडे यांना गौरविण्यात आले.

COMMENTS