उत्तराखंडमध्ये कार नदीत कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्तराखंडमध्ये कार नदीत कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू

रामनगर/वृत्तसंस्था : उत्तराखंडमधील रामनगरमध्ये मुसळधार पावसामुळे ढेला नदीला पूर आला होता. या नदीचे पाणी पुलावरून जात होते. अशा पुलावरून एक एर्टीगा का

बिहारमध्ये होळी स्पेशल ट्रेनला आग
सर्वसामान्यांना झटका… घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ…
रेल्वे आगीचे अपघात रोखण्यासाठी विशेष उपक्रम

रामनगर/वृत्तसंस्था : उत्तराखंडमधील रामनगरमध्ये मुसळधार पावसामुळे ढेला नदीला पूर आला होता. या नदीचे पाणी पुलावरून जात होते. अशा पुलावरून एक एर्टीगा कार नदीत कोसळली असून या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात एका मुलीला वाचवण्यात बचाव कार्याला यश आले आहे. जखमी मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तराखंडमधील रामनगर जिल्ह्यातील जिम कॉर्बेट येथे जाणार्‍या रस्त्यावर हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त एर्टीगा गाडीत 11 लोकं होते. ते सर्व पंजाबमधून उत्तराखंड येथे फिरायला आले होते. रामनगरमधून जिम कॉर्बेटला जाणार्‍या रस्त्यावर ढेला नदीवर एक पूल आहे. नदीला पूर आल्याने नदीचे पाणी पुलावरून जात होते. पाण्याचा प्रवाह जास्त होता. काही स्थानिकांनी एर्टिगा गाडीच्या चालकाला पुढे न जाण्याचा इशारा केला होता. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करत पुलावर गाडी घातली. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाडी नदीत कोसळली व हा अपघात झाला.

COMMENTS