Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार

संगमनेर ः नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेले व मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ

चापडगावमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची बैठक उत्साहात
अनधिकृत फलक हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विनंती अर्ज
प्रवासादरम्यान सापडलेली पर्स केली परत

संगमनेर ः नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेले व मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी संगमनेरला सदिच्छा भेट दिली असून विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांसह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा ठाम विश्‍वास व्यक्त केला.
डॉ. सुधीर तांबे यांच्या इंदिरानगर येथील निवासस्थानी खासदार वाजे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शहराध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, विश्‍वासराव मुर्तडक, हिरालाल पगडाल, नितीन अभंग, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, अजय फटांगरे, गौरव डोंगरे, उबेद शेख, प्रा. बाबा खरात, शिवसेनेचे संजय फड, कैलासराव वाकचौरे, सुमित पानसरे, राणी प्रसाद मुंदडा, श्रीराम मुंगसे गुरुजी, नांदूर शिंगोटेचे अनिल सांगळे, विजय उदावंत, शिवाजी जगताप, आदींसह काँग्रेस शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत यांचासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विश्‍वास दाखवला. आपण कायम पुरोगामी विचारांचा वारसा जपला असून सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे.नाशिककडे देशाचे लक्ष होते. मात्र एकतर्फी विजय मिळवण्यामध्ये जनतेचा मोठा सहभाग राहिला आहे. देशाचे संविधान आणि देशाची एकात्मता वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या 31 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात सह महाराष्ट्रातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येणार असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनेल असा विश्‍वास व्यक्त करताना काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रति खासदार वाजे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

COMMENTS