Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात नवजात अर्भकाला फेकले रस्त्यावर ; आवाज येऊ नये म्हणून तोंडाला बांधली पिशवी

पुणे : पुण्याला खरंतर मोठ्या सामाजिक चळवळीची पार्श्‍वभूमी. मात्र याच पुण्यात माणूसकी ओशाळणारी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात नवजात अर्भकाल

समान नागरी कायद्यासाठी 4 मंत्र्यांची समिती
पाचशेवर कामगारांची झाली एचआयव्ही तपासणी; अमृतदीप प्रकल्पात स्थलांतरीतांना आरोग्य मार्गदर्शन
देशातील 88 जागांसाठी आज मतदान

पुणे : पुण्याला खरंतर मोठ्या सामाजिक चळवळीची पार्श्‍वभूमी. मात्र याच पुण्यात माणूसकी ओशाळणारी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या बाळाचा रडण्याचा आवाज येवू नये म्हणून त्याच्या तोंडाला पिशवी बांधण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणानंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या वडगाव बुद्रुकमध्ये ही घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना कळवली. बाळाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून पोलिस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. या घटेननंतर लोकांकडून नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेनं समाजमन देखील हादरुन गेले आहे. बालकाला जन्म दिल्यानंतर लगेच रस्त्यावर सोडून देण्यात आले. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरमधील ही घटना आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून बाळाचे तोंड प्लास्टिकच्या पिशवीने गुंडाळले होते. सोमवारी रात्रीच्या वेळी बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी याबाबत सिंहगड पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर, सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची तब्बेत स्थिर आहे.

COMMENTS