दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा 'आदिपुरुष' हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं 'आदिपुरुष' च्या टीमनं पाच वेगवेगळ्या
दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं ‘आदिपुरुष’ च्या टीमनं पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचा एक लिरिकल ऑडियो क्लिप शेअर करण्यात आला आहे. खरंतर या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर हा गेल्या वर्षी शेअर करण्यात आला होता. त्यावेळी त्याच्यातील VFX इफेक्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना हे कार्टून चित्रपटासारखं आहे असं म्हटलं. दरम्यान, आता ऑडियो क्लिप प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबत प्रभासचा एक पोस्टरही शेअर करण्यात आला आहे. प्रभास या चित्रपटात श्री राम यांची भूमिका साकारत आहे. हातात धनुष्य बाण धरलेल्या श्री रामांच्या भूमिकेत प्रभास दिसत असून या ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला येत की ‘तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे। दुविधा की घड़ी में ये मन तुझको ही पुकारे। तेरे ही बल से है बल हमारा, तू ही करेगा, मंगल हमारा। मंत्रों से बढ़के तेरा नाम, जय श्री राम राजा राम।’ ही लिरिकल ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची घोषणा ही 12 जानेवारी 2023 रोजी टीझर शेअर करत केली होती.
COMMENTS