Homeताज्या बातम्यादेश

नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा नवीन संसद भवन साक्षीदार बनेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्य

जागतिक पातळीवर भारताचा डंका
आव्हानांवर सामूहिकपणे मात करण्याची गरज ः पंतप्रधान मोदी
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी सूचना पाठवा ः पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी : आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाचा नवीन संसद भवन साक्षीदार बनेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना व्यक्त केला. नव्या संसदेतले पंतप्रधानांचे हे पहिलेच भाषण असल्याने त्याकडे देशवासियांचे लक्ष लागले होते. भारत ही लोकशाहीची जननी तर आहेच पण जागतिक लोकशाहीसाठी ती प्रेरक देखील आहे. संविधान हाच आमचा संकल्प आहे. लोकशाही हा आमचा विचार, संस्कार आणि परंपरा आहे. पंचायत भवनापासून ते संसद भवनापर्यंत येथील लोकांचा विकास हीच आमची प्रेरणा आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
आज जेव्हा नवीन संसदेच्या निर्मितीवर आपण गर्व करत आहोत. तेंव्हा गेल्या 9 वर्षात चार कोटी गरिबांसाठी घरे, 4 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 11 कोटी शौचालयांची बांधणी या बाबींचा विचार करताना मला समाधान होत आहे. असे सांगून मोदी म्हणाले, नवीन संसद ही देशाची गरज होती. आगामी काळात लोकसभा मतदार संघांच्या तसेच खासदारांच्या संख्येत वाढ होण्याच्या अनुषंगानेही विचार करणे आवश्यक होते. शिवाय मागील दोन दशकांपासून नवीन संसदेच्या उभारणीची मागणी होत होती.
कित्येक वर्षांच्या विदेशी शासनामुळे आपला गौरव हिरावून घेतला होता. त्या वसाहतवादी मानसिकतेला आता देशवासियांनी मागे टाकले आहे. आणखी 25 वर्षांनी देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. त्यामुळे पुढील 25 वर्षाच्या काळात आपणास विकसित राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटावे लागणार आहे. नवीन संसद भवन उभारणीमुळे 60 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. या श्रमिकांना समर्पित अशी डिजिटल गॅलरी बनविण्यात आली आहे. आज जेंव्हा आपण लोकसभा व राज्यसभेकडे पाहतो, तेंव्हा 30 हजारपेक्षा जास्त पंचायत इमारती बनल्या, याचे मला समाधान आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
जेंव्हा भारत पुढे जातो, तेंव्हा जग पुढे जाते. देशाच्या विकासाच्या माध्यमातून जगही पुढे जाईल, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवीन संसदेचे उद्घाटन हा सुवर्णमयी क्षण आहे. त्यासाठी आपण देशवासियांना शुभेच्छा देतो. हे केवळ भवन आहे असे नाही तर ते 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षेचे प्रतिबिंब आहे. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे. याठिकाणी होणारा प्रत्येक निर्णय हा देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आणि येणार्‍या पिढ्यांना सशक्त करणारा आहे. संसदेचे प्रत्येक दार आणि येथील प्रत्येक कण-कण गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. ‘देश प्रथम’ हा दृष्टीकोन ठेवून आपणास यापुढची वाटचाल करावी लागणार आहे. त्यासाठी व्यवहारातून उदाहरण सादर करावे लागेल. स्वतःमध्ये सदैव सुधारणा कराव्या लागतील. नवे रस्ते स्वतः बनवावे लागतील. लोककल्याण हा आपला जीवनाचा मंत्र बनवावा लागेल. नव्या संसदेत जेव्हा इमानदारीने जबाबदारी पार पाडली जाईल, तेंव्हा देशालाही प्रेरणा मिळेल.

नवीन संसद भवन सर्व सुविधांनी युक्त - महात्मा गांधींनी स्वराज्याच्या संकल्पनेने प्रत्येक देशवासियाला जोडले होते. याच्याच परिणामी आपणास सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हाही महत्त्वाचा टप्पा आहे. रालोआ सरकारची मागची 9 वर्षे ही गरिबांच्या कल्याणाची राहिलेली आहेत. या 9 वर्षांमध्ये हजारो अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. नवीन संसद भवन सर्व सुविधांनी युक्त आहे. याठिकाणी सदनात थेट सूर्यप्रकाश येत आहे, हे आपण पाहत आहात. जुन्या संसद भवनात काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. तंत्रज्ञानाचा वापर असो वा बसण्याची अपुरी व्यवस्था असो. त्याचमुळे नवीन संसद बनविणे आवश्यक ठरले होते, असे मोदी म्हणाले.

COMMENTS