स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजक तयार होतील : बापुसाहेब पुजारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजक तयार होतील : बापुसाहेब पुजारी

बेलापूर : स्टार्ट अप महाराष्ट्र योजनेतून नव उद्योजक निश्रि्चतपणे तयार होतील असे उद्गार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त व जेटीएस शिक्षण संकुलाचे

57 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पुर्वतयारी उत्साहपूर्वक
श्री साईपावन प्रतिष्ठानच्या नेत्र तपासणी शिबिरास उत्तम प्रतिसाद
मराठा आरक्षणासाठी भातकुडगाव फाट्यावर उपोषण

बेलापूर : स्टार्ट अप महाराष्ट्र योजनेतून नव उद्योजक निश्रि्चतपणे तयार होतील असे उद्गार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त व जेटीएस शिक्षण संकुलाचे चेअरमन बापूसाहेब पुजारी यांनी काढले. ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 मध्ये जाहीर झाले. यशस्वी उद्योजक घडवण्यासाठी स्थापना, गुणवत्ता ,परीक्षण व बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या योजना राबवल्या गेल्या आहेत. नाविन्यता व कल्पकता असेल योग्य पाठबळ असेल ,योग्य मार्गदर्शन असेल तर नवनवीन उद्योजक निश्‍चितपणे तयार होतील असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्‍वस्त शेखर डावरे ,शिक्षक प्रतिनिधी सुनिता ग्रोव्हर उपस्थित होते.प्रास्ताविक आयटीआय कॉलेजचे प्राचार्य विकास थोटे यांनी केले. ते म्हणाले की, या योजनेसाठी क्यूआर कोड दिलेला आहे.नावनोंदणी करुन प्रोजेक्ट सादर केला तर महाराष्ट्र शासनाकडून अर्थ सहाय्य व सरकारी मदत सहज मिळविण्यास प्राधान्य मिळेल.यातूनच महाराष्ट्राचा कायापालट होईल कारण एक भक्कम इकोसिस्टीम सुरु झाली आहे.त्यांच्या समवेत संकेत जैसस्वाल, खढख चे इनस्ट्रक्टटर चौधरी सर,प्रा.जे.जे.विटनोर, प्रा.पी.पी.जाधव, प्रा. यु. ए. आंबिलवादे, प्रा.जगधने, प्रा. खेडेकर, प्रा. कुमावत आदि.सर्वजण उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजन रिसर्च इनोव्हेशन अ‍ॅण्ड स्टार्ट अप विभागाचे समन्वयक डॉ.अशोक माने ,प्रा.विठ्ठल सदाफुले आणि जेटीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीराम कुंभार यांनी केले तर स्टार्ट अपच्या आयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.जेटीएस हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज,केशवगोविंद माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेज बेलापूर खु॥,वाघूजी रामजी पाटील माध्यमिक विद्यालय बेलापूर खु.,माध्यमिक विद्यालय उक्कलगाव,माध्यमिक विद्यालय पढेगाव, अहिल्याबाई होळकर माध्यमिक शाळा बेलापूर ,कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूरचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.विविध विद्यालयांचे सर्व मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्टार्टअप महाराष्ट्रसाठी परिश्रम घेतले.

COMMENTS