Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाचाच निघाला धाडसी घरफोडीतील चोर

उमरखेड येथील घटनेचा लागला छडा

यवतमाळ प्रतिनिधी- घरातील सदस्य लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून उमरखेड येथे झालेल्या नऊ लाख 37 हजार 200 रुपयांच्या धाडसी चोरीचा

कोयत्याने हल्ला करत केली तरुणाची हत्या
परमबीर सिंग यांच्या अटकेस मनाई
ऋषभ पंत वर्ल्ड कप आणि आशिया कपमधून बाहेर

यवतमाळ प्रतिनिधी– घरातील सदस्य लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून उमरखेड येथे झालेल्या नऊ लाख 37 हजार 200 रुपयांच्या धाडसी चोरीचा मास्टरमाईंड भाचाच निघाला. उमरखेड पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या घटनेचा छडा लावला आहे.

अक्षय ढोले (वय 28, रा. सुकळी, ता. आर्णी), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. कैलास हरिभाऊ शिंदे यांच्या घरी ही चोरी झाली होती. भाच्यानेच ही घरफोडी केल्याची बाब निष्पन्न झाली. शिंदे कुटुंबीय हे लग्न कार्यासाठी माहूर येथे गेले होते. परत आल्यावर  ही घटना उघडकीस आली. मुलीच्या लग्नासाठी त्यांनी नुकतीच सोने, चांदीची खरेदी केली होती. अक्षय याने घरी कुणीही नसल्याची संधी साधून वेशांतर करून आत प्रवेश केला. 485 ग्रॅम सोने, दोन किलो चांदी, रोख एक लाख रुपये, असा एकूण नऊ लाख 37 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.त्याच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 90 टक्के मुद्देमाल व रोख 19 हजार रुपये जप्त करण्यात आले. अक्षय हा अभियांत्रिकी अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे.

COMMENTS