नवी दिल्ली : भारत 1947 साली स्वातंत्र्य झाला असला, तरी गोवा हा उशीरा स्वातंत्र्य झाला, यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर तत्का
नवी दिल्ली : भारत 1947 साली स्वातंत्र्य झाला असला, तरी गोवा हा उशीरा स्वातंत्र्य झाला, यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना आपली प्रतिष्ठा महत्वाची वाटत होती, त्यामुळेच त्यांनी बराच काळ गोवा पारतंत्र्यांत ठेवला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत केली.
गोव्याच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने लता मंगेशकर कुटुंबीयांचा अपमान केल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, सावरकरांची कविता गायल्याने हृदयनाथ मंगेशकरांना गोव्याच्या आकाशवाणीतून काढले होते. तत्कानील काँग्रेस सरकारने ही कारवाई केली होती. काँग्रेस घराण्याने लता मंगेशकर कुटुंबीयांचा अपमान केला. त्यांच्या कुटुंबासोबत काँग्रेसने कसा व्यवहार केला, हे देखील पाहायला पाहिजे. हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडीओमधून काढण्यात आले. त्यांनी वीर सावरकर यांची देशभक्तीपर कविता ऑल इंडिया रेडिओवर म्हटली होती. त्यामुळे काँग्रेसने ही कारवाई केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गोवामुक्तीला 60 वर्ष झाले आहेत. गोव्याचे लोक ऐकत असतील. सरदार पटेल यांनी हैदराबादसाठी रणनिती आखली होती. जुनागढसाठी पुढाकार घेतला. त्यांची प्रेरणा घेऊन गोव्यासाठी तशी रणनिती बनवली असती तर गोव्यात भारताच्या स्वातंत्र्यानंतर 15 वर्षापर्यंत गोवा गुलामीत रखडला नसता असे पंतप्रधानांनी सांगितले. तेव्हाचे पंतप्रधान पंडीत नेहरू आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करायचे. त्यामुळे गोव्यात जे व्हायचे ते होऊ देत. पण, त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी गोव्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी सैन्य पाठवण्यास नकार दिला होता. संदर्भ म्हणून मोदींनी 15 ऑगस्ट 1955 रोजीचे नेहरूंचे भाषण वाचून दाखवले. तसेच काँग्रेसने गोव्यावर अत्याचार केल्याचे सांगितले.
COMMENTS