पाथर्डी : शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या रामगिरबाबांची यात्रा अवघ्या एका महिन्यावर {१९ मार्च) येऊन ठेपली असताना सध्या या टेकडीची पूर्णपणे दुर्दशा झाली असल्याचे चित्र आहे. यात्रेच्या दिवशी रामगिर बाबांच्या समाधीचे दर्शन भाविकांना घेता येईल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रामगीर बाबांचे समाधी मंदिर हे शहराच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवर वसलेले आहे. दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते. तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक या दिवशी रामगिरबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. यंदाच्या यात्रेला अवघा एक महिना शिल्लक असताना टेकडीवरील परिस्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनच्या कामासाठी टेकडीवर जाणाऱ्या मुख्य पायऱ्या अनेक ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत तर काही पायऱ्या काढून टाकण्यात आल्या असल्याने यात्रेच्या दिवशी या पायऱ्यांवरून जाताना भाविकांना अडचण येणार आहे. टेकडीवर जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी तो चढणाचा आणि अवघड आहे.त्यामुळे महिला, लहान मुले व वृद्ध भाविकांना त्रास सहन करावा लागणार आहे.या पर्यायी रस्त्यावरील अवघड वळणावर रस्त्याच्या बाजूला कठडे नसल्याने दुचाकीवरून आलेल्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर यात्रेपूर्वी पालिकेने तातडीने लक्ष घालून पायऱ्यांची पुनर्बांधणी, वीजव्यवस्था, स्वच्छता मोहीम, झाडझुडपांची छाटणी आणि खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. रामगीरबाबांच्या यात्रेला जुनी परंपरा असून ज्या टेकडीवर रामगिर बाबांची समाधी आहे त्या टेकडीची मोठी दुर्दशा सध्या झाली आहे. यात्रेपूर्वी पालिकेने येथील दुरावस्था दूर करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मद्यपींनी केली दुरवस्था याशिवाय टेकडीवर कोणतीही वीजव्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसर रात्री अंधारात बुडालेला असतो. अंधाराचा फायदा घेत काहीजण येथे मद्यपान करत असल्याने रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा खच टेकडीवर सर्वत्र पडलेला असून त्यामुळे परिसराचे पावित्र्य आणि स्वच्छता धोक्यात आली आहे. टेकडीवर वेड्या बाभळीचे मोठे जंगल तयार झाले आहे. पूर्वी येथे सुंदर बगीचा होता, तसेच लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली होती.मात्र कालांतराने देखभालीअभावी बगीचा नामशेष झाला असून खेळणीही हटवण्यात आली आहेत. परिणामी, नागरिकांसाठी हे ठिकाण आकर्षण केंद्र राहिलेले नाही.

पाथर्डी : शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या रामगिरबाबांची यात्रा अवघ्या एका महिन्यावर {१९ मार्च) येऊन ठेपली असताना सध्या या टेकडीची पूर्णपणे दुर्दशा झाली असल्याचे चित्र आहे. यात्रेच्या दिवशी रामगिर बाबांच्या समाधीचे दर्शन भाविकांना घेता येईल की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रामगीर बाबांचे समाधी मंदिर हे शहराच्या मध्यभागी असलेल्या टेकडीवर वसलेले आहे. दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते. तालुक्यासह परिसरातील हजारो भाविक या दिवशी रामगिरबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. यंदाच्या यात्रेला अवघा एक महिना शिल्लक असताना टेकडीवरील परिस्थिती मात्र चिंताजनक बनली आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या नवीन पाईपलाईनच्या कामासाठी टेकडीवर जाणाऱ्या मुख्य पायऱ्या अनेक ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहेत तर काही पायऱ्या काढून टाकण्यात आल्या असल्याने यात्रेच्या दिवशी या पायऱ्यांवरून जाताना भाविकांना अडचण येणार आहे.
टेकडीवर जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी तो चढणाचा आणि अवघड आहे.त्यामुळे महिला, लहान मुले व वृद्ध भाविकांना त्रास सहन करावा लागणार आहे.या पर्यायी रस्त्यावरील अवघड वळणावर रस्त्याच्या बाजूला कठडे नसल्याने दुचाकीवरून आलेल्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर यात्रेपूर्वी पालिकेने तातडीने लक्ष घालून पायऱ्यांची पुनर्बांधणी, वीजव्यवस्था, स्वच्छता मोहीम, झाडझुडपांची छाटणी आणि खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. रामगीरबाबांच्या यात्रेला जुनी परंपरा असून ज्या टेकडीवर रामगिर बाबांची समाधी आहे त्या टेकडीची मोठी दुर्दशा सध्या झाली आहे. यात्रेपूर्वी पालिकेने येथील दुरावस्था दूर करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मद्यपींनी केली दुरवस्था
याशिवाय टेकडीवर कोणतीही वीजव्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसर रात्री अंधारात बुडालेला असतो. अंधाराचा फायदा घेत काहीजण येथे मद्यपान करत असल्याने रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा खच टेकडीवर सर्वत्र पडलेला असून त्यामुळे परिसराचे पावित्र्य आणि स्वच्छता धोक्यात आली आहे. टेकडीवर वेड्या बाभळीचे मोठे जंगल तयार झाले आहे. पूर्वी येथे सुंदर बगीचा होता, तसेच लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली होती.मात्र कालांतराने देखभालीअभावी बगीचा नामशेष झाला असून खेळणीही हटवण्यात आली आहेत. परिणामी, नागरिकांसाठी हे ठिकाण आकर्षण केंद्र राहिलेले नाही.

COMMENTS