Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणप्रश्‍नी समन्वयाची भूमिकेची गरज ः खा. शरद पवार

पुणे ः राज्यात आरक्षणाचा प्रश्‍न तीव्र बनला आहे. मात्र आरक्षण प्रश्‍नांशी संबंधित घटकांनी समन्वयाची भूमिका घेण्याची गरज आहे. जात-धर्म वेगळा असला

शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी
तुमच्या घरी छापे पडल्यानंतर पक्षाने काय करायचे?
आपल्या मर्जीनुसार शरद पवार पक्ष चालवतात

पुणे ः राज्यात आरक्षणाचा प्रश्‍न तीव्र बनला आहे. मात्र आरक्षण प्रश्‍नांशी संबंधित घटकांनी समन्वयाची भूमिका घेण्याची गरज आहे. जात-धर्म वेगळा असला तरी, शेवटी आपण भारतीयच असल्याचे मत खासदार शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर देखील भाष्य केले.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात बोलतांना शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र येवून निवडणूक लढणार आहेत. तीन पक्ष एकत्र लढताना त्यावेळी कुठल्याही एका जागेवर तिघांपैकी कोणी ती जागा लढवावी याबाबतचा निर्णय आणि एकवाक्यता करावी लागेल, ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत आहेत. जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर प्रत्येक पक्ष कोणता उमेदवार द्यायचा यावर विचार करेल, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे. राज्यात सुरू असलेल्या आरक्षण मुद्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आरक्षणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र तणाव होण्याचे कारण नाही, शेवटी आपण सगळे जात धर्म काही असली तरी भारतीय आहोत. महाराष्ट्राचे घटक आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये सामंजस्य कसे करता येईल याबाबतची भूमिका या क्षेत्रात नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. याच सोबत राज्य सरकारने देखील या प्रश्‍नांना विलंब लावू नये, लोकांना विश्‍वासात घ्या आणि त्याची पूर्तता करून वातावरण चांगले कसे राहील याची काळजी घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी सरकारला दिला आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या अतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. यावर देखील शरद पवारांनी भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, अरविंद केजरीवाल चांगले काम करत होते. अरविंद केजरीवाल यांना एका विशिष्ट स्थितीत कॉर्नर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले. यानंतर केजरीवाल यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून ज्यांची निवड करण्यात आली त्यांचे काम आम्ही दिल्लीत पाहिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून या पूर्वी दोन महिला नेत्यांनी नेतृत्व केले होते. त्याच प्रकारे अतिशी देखील काम करत दिल्लीच्या प्रशासनाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्‍वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS