Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीत पास होण्यासाठी 35 नव्हे 20 गुणांची गरज

पुणे : महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेत अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. या बदलामुळे आता गणित आणि विज्ञान या विषयांची भीती वाटणार्‍या विद्यार्

संगमनेरमध्ये ईडीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
लाईव्ह मॅच दरम्यान कबड्डी खेळाडूचा मृत्यू.
किरीट सोमैया यांची माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका 
दहावी News in Marathi, दहावी Breaking News, Latest News & News Headlines in  Marathi: Zee 24 taas

पुणे : महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेत अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. या बदलामुळे आता गणित आणि विज्ञान या विषयांची भीती वाटणार्‍या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये आता 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले तरी विद्यार्थांना अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंबधी तरदूद करण्यात आली आहे.
आता विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली. बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी असा विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे. मात्र त्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय समोर येणार आहे. एक म्हणजे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा पुन्हा परीक्षा देणे. मात्र हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे ज्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा विज्ञान विषयाची भिती कायमची वजा होणार आहे.

COMMENTS