Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरात 19 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा : विजयबापू पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असलेली राष्ट्रवादी

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे फार्मा तिर्थाटन !
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी
शिवरायांची तलवार कोणत्या जाती-धर्माविरुध्द नव्हती : श्रीमंत कोकाटे

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा मंगळवार, दि. 19 एप्रिल रोजी इस्लामपूर शहरात येत आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संवाद यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी केले.
इस्लामपूर येथील जयंत पाटील खुले नाट्यगृह येथे सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी वाळवा पंचायत समितीसमोर संवाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येईल. तेथून शहराच्या मुख्य मार्गावरून मोटार सायकल रॅलीने कचेरी चौकात यात्रा येईल. येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर यात्रा जयंत पाटील खुल्या नाट्य गृहाकडे जाईल. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, मंत्री, विविध सेलचे राज्य अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
ना. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यातील एक परिवार संवाद यात्रा आहे. गडचिरोली या आदिवासी भागातून दि. 28 जानेवारी रोजी सुरू झालेल्या संवाद यात्रेने संपूर्ण राज्य पादाक्रांत केले आहे. ही यात्रा कोकण भाग, सातारा जिल्ह्यातून इस्लामपूरला येणार आहे. पूर्वी पक्षाच्या संघर्ष यात्रेचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी जोरदार स्वागत केले होते. यावेळी जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात झालेली जाहीर सभा विक्रमी गर्दी व मोबाईल टॉर्च फोटोने राज्यात गाजली होती. तसेच संवाद यात्रेचे स्वागत आम्ही करणार आहोत. प्रतिक पाटील, राजवर्धन पाटील, प्रा. शामराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिवार संवाद यात्रेची जोरदार तयारी करत आहेत.

COMMENTS