शेवगाव ः तालुक्यात झालेल्या 27 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मध्ये राष्ट्रवादीने 13 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवत, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्य

शेवगाव ः तालुक्यात झालेल्या 27 ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी मध्ये राष्ट्रवादीने 13 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवत, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक सदस्यपदाच्या जागा पटकावल्या. शेवगाव तहसील कार्यालयातील सभागृहात सोमवारी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतमोजणी मध्ये काही ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले.
तालुक्यातील सामानगाव, वरुर, बालमटाकळी, ढोरसडे-अंत्रे, वडुले बुद्रुक आदी ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले आहे. बालमटाकळी, सामानगाव, ढोरसडे-अंत्रे, ग्रामपंचायतीमध्ये भाजपकडे असलेली सत्ता राष्ट्रवादीने खेचून आणली आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यातील वडुले बुद्रुक, वरुर ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकावला आहे. तसेच तालुक्यातील खरडगाव मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या जनशाक्ती आघाडीने मुसंडी मारुन राष्ट्रवादीच्या ताब्यातील सत्ता खेचून आणली आहे. तर बर्हानपुर व शेकटे येथे सदस्य पदासाठी समान मते पडल्याने ईश्वरी चिठ्ठी द्वारे अशोक कुंडलिक वाणी, गीताबाई चव्हाण ह्या विजयी झाल्या आहेत. काही ग्रामपंचायत मध्ये गाव पातळीवर राष्ट्रवादी व भाजप समर्थकांनी युती करुन स्थानिक आघाडीच्या झेंड्या खाली निवडणूक लढवली होती. स्थानिक आघाडीने तब्बल चार ग्रामपंचायत काबीज केल्या आहेत. तर भाजपने सहा ग्रामपंचायत काबीज केल्या आहेत.
COMMENTS