Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतोष देशमुख हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष अटकेत

बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी चौथ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी विष्णू

पुण्यात कुख्यात गुंडाची दगडाचे ठेचून हत्या
पुण्यातील वसतिगृहाला आग
कार- बाईकला विमानाची धडक, 10 जणांचा मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी चौथ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँगे्रसचा माजी तालुकाध्यक्ष आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणीमधील आरोपी असल्याचे बोलले जात आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता. मात्र पक्षातून त्याचा निलंबन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचा खून (9 डिसेंबरला) झाला होता. बुधवारी नवव्या दिवशी विष्णू चाटे याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह इतर दोघे अद्याप फरार आहेत. मस्साजोग ता. केज येथील सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी केज जवळून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती.

COMMENTS