Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड सरपंच हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष आरोपी

बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहर करून त्यांची हत्या करण्यात आली. मात्र अपहरण कशासाठी आणि कुणी केले,

बॉटलमध्ये डिझेल द्यायला नकार दिल्याने मारहाण | LOKNews24
अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष
’आट्टम’ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार

बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहर करून त्यांची हत्या करण्यात आली. मात्र अपहरण कशासाठी आणि कुणी केले, असा सवाल उपस्थित होत असतांना यातील चौथा आरोपी म्हणून केज तालुक्याचे राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचाही समावेश करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत आता एकूण आरोपींची संख्या 7 झाली आहे. पोलिसांनी यातील तिघांना ताब्यात घेतले असून, उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे.
बुधवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता मस्साजोग ता. केज येथील सरपंच संतोष पंडितराम देशमुख यांचे टोल नाक्यावरून अपहरण करून त्यांची हत्या करून त्यांचे प्रेत फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाहीं तोपर्यंत प्रेत ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गावकरी आणि नातेवाईकांनी घेतली होती. तसेच दि.10 डिसेंबर रोजी मस्साजोग आणि केज येथे 12 तासापेक्षा जास्त काळ रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णाला केज येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या देखरेखीखाली प्रेताचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता शिंदी रस्त्यालगतच्या शेतात दोन दिवसानंतर संस्कार करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन संशयित आरोपींना केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. तिसरा आरोपी रांजणगाव येथून ताब्यात घेतला आहे. खून प्रकरणातील तिसरा आरोपी प्रतीक घुले याला जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यावेळी घुले याच्याकडील माहितीनुसार केज तालुका अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णु चाटे देखील आरोप असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील सर्व सरपंच यांनी दत्ता काकडे, प्रदेशाध्यक्ष परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता बाकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संतोष देशमुख यांच्या हायेचा निषेध म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतचे कामकाज एक दिवस बंद केले होते.

दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा पवनचक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. पवनचक्कीच्या कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात आज एक नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील मस्साजोग परिसरात आबादा कंपनीचा पवनचक्कीचा प्रोजेक्ट आहे. या कंपनीतील शिंदे नामक अधिकार्‍याने केज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीकडे तब्बल दोन कोटी रूपयांची खंडणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मागितल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

तिघे ताब्यात आणखी चौघे फरार
सरपंच संतोष देशमख यांच्या खून प्रकरणी अशोक नारायण पुले. सुदर्शन घुले, प्रतीक फुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे आणि महेश केदार हे सात आरोपी असून त्यातील जयराम चाटे आणि महेश केदार आणि प्रतीक घुले है पोलिसांच्या जाळ्यात अजून आजून चौथे फरारी आहेत. त्यांचा पोलीस तपास येत आहेत.

COMMENTS