Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात

कोपरगाव ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येवून राष्ट्रवादी का

रामनाथ भोजने यांचा वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मान
भोजडे येथील मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा कौतुकास्पद – विवेक कोल्हेे
पुणतांब्याचा पाणीप्रश्‍न न्यायालयीन लढाईत अडकणार ?

कोपरगाव ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपरगाव मतदार संघात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आ.आशुतोष काळे यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. मतदार संघातील रस्ते,वीज,पाणी,आरोग्य आदी विकासाचे बहुतांशी मूलभूत प्रश्‍न सुटले असून मतदार संघातील जनता आ.आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर समाधानी आहे.मतदार संघातील इतरही विकासाचे प्रश्‍न यापुढील काळात आ.आशुतोष काळे सोडविणार असून मतदार संघाच्या विकासाची गती यापुढेही कायम राहणार आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांशी बांधील असणार्‍या व जनतेचे हित साधणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व आ.आशुतोष काळे यांचे बाहू बळकट करण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी एकमुखी निर्धार केला. याप्रसंगी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS