Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मतदारांवर हल्ला

मतदान केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न

रांची : छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. वोटिंग सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली असतांना,

शेकाप’चे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांचं निधन | LOKNews24
19 हजार महिला बेपत्ता असतांना गप्प बसायचे का ?
सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे

रांची : छत्तीसगडमध्ये मंगळवारी सकाळपासून विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. वोटिंग सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली असतांना, दुपारी सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी फायरिंग करत मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. कोंटा पोलीस ठाण्यातील बंडा भागात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.
दूरमा आणि सिंगाराम येथील जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर बीजीएल डागले. घटनास्थळी  सीआरपीएफ आणि डीआरजीची टीम तैनात आहे. छत्तीसगडमध्ये होत असलेल्या मतदानादरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत तीन ठिकाणी नक्षलवाद्यांनी हल्ले केले आहेत. सुकमामधील टोंडामरका भागात नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट केला. या स्फोटात निवडणूक ड्युटीवर तैनात सीआरपीएफ कोबरा बटालियनचा एक जवान जखमी झाला. ही माहिती सुकमा एसपी किरण चव्हाण यांनी दिली. तर दोन ठिकाणी मतदान केंद्रांवर गोळीबार आणि केंद्र ताब्यात घेण्यात आले आहे. आज मतदान होत असलेला भाग नक्षलग्रस्त असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान घेतले जाणार आहे. 20 पैकी 10 मतदारसंघांत ही वेळ आहे. येथे नक्षलवाद्यांनी गोळाबर करत मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखले. सुकमामध्ये नक्षलवाद्यांना मतदानासाठी जात असलेल्या मतदारांवर गोळीबार करून त्यांना मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. कोंटा पोलिस ठाणे क्षेत्रातील बंडामध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये फायरिंग झाली. तसेच दुरमा आणइ सिंगारामच्या जंगलातून नक्षल्यांनी मोर्टार डागले होते.

COMMENTS