Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिकांचा तुरुगांतील मुक्काम लांबला

ईडीच्या विरोधानंतर वैद्यकीय जामीन नाकारला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे त्यांचा तुरुंगातील म

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना परदेशातून धमकी
अहमदनगरमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ
समस्येचे नशीब

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे त्यांचा तुरुंगातील मुक्काम लांबणार आहे. मलिकांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
किडनीच्या विकाराने ग्रस्त मलिकांनी ट्रान्सप्लांटसाठी कोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. मात्र या मागणीला ईडीने जोरदार विरोध केला होता. गेले वर्षभर मलिक हे त्यांच्या इच्छेनुसार रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपाचारांत कधीही तपासयंत्रणेने आडकाठी केली नाही. तसेच एका किडनीवरही आयुष्य जगता येते. सध्या देशभरांतील कारागृहात मलिकांपेक्षा आजारी आणि वयस्कर कैदी आहेत, त्यामुळे हा त्यांच्यावर अन्याय होईल असे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टाकडे स्पष्ट केले होते. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 45 नुसार 16 वर्षांपेक्षा कमी वयाचा आरोपी, महिला आरोपी किंवा आजारी आरोपींना जामिनाची तरतूद असल्याकडेही देसाई यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले होते. मात्र हायकोर्टाने ईडीचा युक्तिवाद मान्य करत नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली. मात्र नवाब मलिकांनी गुणवत्तेच्या आधारावर दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जवर दोन आठवड्यांनी सुनावणी घेण्याचे हायकोर्टाने मान्य केले आहे.

COMMENTS