नवी दिल्ली: गुन्हेगारी जगताशी संबंधीत मनी लाँड्रीग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अटकेच्या विरोधात मुंबई उ
नवी दिल्ली: गुन्हेगारी जगताशी संबंधीत मनी लाँड्रीग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अटकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत म्हटलेय की, त्यांना करण्यात आलेली अटक हे बेकायदेशीर आहे. तसेच त्यांना ताबडतोब मुक्त करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली आहे. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सोमवारी जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नवाब मलिक यांना 25 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
COMMENTS