नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का ?

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का ?

नवरात्रीची लगबग सगळीकडे सुरू झाली आहे. त्यासाठी नऊ दिवस होणारे उपवास, धार्मिक कार्यक्रम, याचबरोबस सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांची रेलचेल आपल्याला बघ

तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये चरबीचा वापर
दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ
इंदापूर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ | DAINIK LOKMNTHAN

नवरात्रीची लगबग सगळीकडे सुरू झाली आहे. त्यासाठी नऊ दिवस होणारे उपवास, धार्मिक कार्यक्रम, याचबरोबस सांस्कृतिक कार्यक्रम या सर्वांची रेलचेल आपल्याला बघायला यंदा मिळणार आहे. मात्र नवरात्रोत्सव कसा साजरा करायचा, यावर टाकूया नजर. नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का असतो ? असा प्रश्‍न मनात येणे साहजिकच आहे. याचेही उत्तर आपणास शोधता येते. ‘ नऊ ‘ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो.
नवरात्री या सणामध्ये माता दुर्गाचे नऊ रूपांची पूजा केली जाते. या बद्दल एक पौराणिक कथा आहे. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला, म्हणून

महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव पडले आहे. तिच्या शक्ती रूपाची पूजा नवरात्रीत केली जाते. नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रुपांची आराधना केली जाते. आराधना करतांना मनामध्ये भक्तीभाव उभारून आला पाहिजे, अशीच सर्वांची धारणा असते. मनात होणारी विकारांची उत्पत्ती नष्ट करण्याच्या उदात्त हेतून देवीची पुजा करून, तिच्या चरणी, लीन होण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास केले, म्हणजे झाले असे नसून उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार पाप वासना दृष्ट बुद्धी या सर्वांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रीत होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे सामर्थ्याचे दर्शन देवीने दिले तशी शक्ती सामर्थ्य आपल्याला स्वतः मध्ये निर्माण करण्यासाठी या उत्सवाचा व या पवित्र नवरात्रीचा महत्त्वाचा फायदा असतो. नवरात्री उत्सवामध्ये देवी हे एक स्त्रीचीच रूप आहे. त्यामुळे समाजामध्ये स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचारांना आळा बसण्यासाठी म्हणजेच त्यांची पूजा झाल्यामुळे लोकांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर निर्माण होतो व नवरात्रीचे दिवसांमध्ये मुलींची पूजा केली जाते. हाही एक महत्वाचा फायदा आपल्याला दिसून येतो. बर्‍याच ठिकाणी मुली जन्माला येण्या अगोदरच त्यांची भ्रूणहत्या केली जाते. त्यामुळे मुलीं जन्माला येऊ द्या असाही संदेश आपल्याला नवरात्री उत्सवातून मिळतो. मुलगी किंवा स्त्री हे एक देवीचे स्वरूप आहे. असे म्हणून नवरात्री उत्सव साजरा केला जात असावा उद्देश आहे.

COMMENTS