शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राज मार्गावरील भायगाव येथील ग्रामदैवत नवनाथ बाबा मंदिरातील पादुका प्रतिष्ठापना सोहळ्यातील कार्यक्रमाचे आयोजन श्री क

शेवगाव तालुका ः शेवगाव-नेवासा राज मार्गावरील भायगाव येथील ग्रामदैवत नवनाथ बाबा मंदिरातील पादुका प्रतिष्ठापना सोहळ्यातील कार्यक्रमाचे आयोजन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज, स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज व श्री संत ज्ञानेश्वर संस्थान नेवाशाचे वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या आशीर्वादाने व भायगावचे भूमिपुत्र आसणारे ज्ञानदीप शिक्षण वारकरी शिक्षण संस्था नेवाशाचे गहिनीनाथ महाराज आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या या सोहळ्याचे ध्वजारोहण गहिनीनाथ महाराज आढाव, भायगाव येथील कीर्तनकार महाराज व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
त्रीदिनी आयोजित या सोहळ्यात दिंडी मिरवणूक धर्मध्वजारोहण व त्यानंतर होमहवन शास्त्र युक्त पूजा पाठ श्री गणेशगुरु कुलकर्णी राजूदेवा वैकर व प्रधानआचार्य हेमंत गुरुजी कुलकर्णी, केदार जोशी, भूषण कुलकर्णी करणार आहेत.बाबासाहेब शिरसाठ व घनश्याम पालवे यांच्या वतीने फरशी व पादुका अर्पण करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत दध्नेश्वर संस्थान दहिगाव-नेचे मठाधिपती सुदाम महाराज शास्त्री यांचा कीर्तनाचा कार्यक्रमानंतर व त्यानंतर हरिचंद्र म्हसू घाडगे, अक्षय गणपत आढाव, शिवनाथ तागड, महादेव नजन, केशव आढाव, संदीप लांडे, ज्ञानदेव मोहन आढाव, कानिफनाथ भगवान आढाव यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास अविनाश महाराज लोखंडे, महेश महाराज शेळके, भाऊसाहेब महाराज शेकडे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, शेषेराव दुकळे, गणपत आढाव, भगवान आढाव, सुदाम खंडागळे, एकनाथ लांडे, बाळासाहेब दुकळे, अशोकराव दुकळे, उमाजी शेकडे, बापूराव दुकळे, नारायण आढाव, भागचंद धावणे, रामकिसन आढाव, विठ्ठल आढाव, श्रीराम शेकडे, पांडुरंग आढाव,लटपटे टेलर, पंढरीनाथ आढाव, रामभाऊ सुरोशे, धोंडीराम ढोरकुले, ज्ञानदेव नेव्हल, संताराम जर्हाड, रंगनाथ खंडागळे, संदीप काळे, नानासाहेब झेंडे, अण्णासाहेब नेव्हल, सतीश शेकडे, कडूबाळ आढाव, अशोकभाऊ शहाणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS