Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये निसर्गप्रेमी एकवटले

अवैध वाळू उपसा करणारांवर कारवाईची मागणी

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर शहरासह तालुक्यात नदी पात्रातून सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा करणार्या वाळू माफियांवर ठोस कारवाई होत नसल्याने, भ्रष्ट म

जमिनीच्या वादातूनच पत्रकार दातीर यांची हत्या ; आरोपपत्र दाखल
कर्जत पोलीस ठाण्यात मुलींची ‘सहल’
रुणाल जरे याच्या अंगरक्षकाला दमबाजी l Rekha Jare Hatyakand l Bal Bothe I LOK News 24

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर शहरासह तालुक्यात नदी पात्रातून सुरु असलेल्या अवैध वाळू उपसा करणार्या वाळू माफियांवर ठोस कारवाई होत नसल्याने, भ्रष्ट महसुल विभागाच्या विरोधात येथील निसर्ग प्रेमी व सकाळी फिरावयास येणार्‍या नागरिकांनी अखेर दंड थोपटले. यावेळी वाळू माफियाराज यांना पळवून लावत आंदोलन छेडले. यावेळी प्रवरा नदी काठी गंगामाई घाट येथे महसूल विभागाच्या विरोधात घोषणा देत वाळू तस्करांनी साठवलेल्या वाळूच्या गोण्या पुन्हा नदीच्या पाण्यात ओतून देवून गोण्या जाळण्यात आल्या. यावेळी प्रांत अधिकारी, तहसिलदार यांना वाळू तस्करांवर जागेवर येवुन कारवाईची मागणी नागरिकानी केली असता त्यांनी येण्यास असमर्थता दाखवली. यावेळी निसर्ग प्रेमी नागरिकांचा राग शांत करण्यासाठी तलाठी तोरणे यांना पाचारण करण्यात आले.

COMMENTS