Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदींच्या स्वागतासाठी निसर्गही गेला सडा शिंपडून  

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून शासकीय यंत्रणा लगबगीने आपले कार्य पार पाडत आहेत. सर्व स्तरावरील यंत्रण

शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…
इस्रोच्या मुख्यालयातून पंतप्रधानांच्या 3 मोठ्या घोषणा
नरेंद्र मोदींच्या भाषणाला कंटाळून नागरिकांनी काढला पळ

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत असून शासकीय यंत्रणा लगबगीने आपले कार्य पार पाडत आहेत. सर्व स्तरावरील यंत्रणा ह्या आपापल्या परीने महत्वाची भूमिका बजावत असतांना. कोण काय ? तर कोण काय बोलते ! यावर सद्या सर्वत्र चर्चाच चर्चा सुरू आहेत. एकीकडे रामजन्मभूमी उत्सव हा मोठ्या दिमाखात साजरा होणार असल्याने सर्व भारतीयांच्या भुवया उंच व्हाव्या असाच दिमाखदार सोहळा अयोध्येत पार पडेल आणि त्याची भारतभर दिवाळी साजरी होणार असल्याने विरोधी पक्षाच्या महत्वकांक्षी लोकांची देखील ओढातान होतांना दिसत असली तरी सर्व समावेशक अशी स्वरूपाची भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतल्यामुळे जण सामान्यांच्या गोंधळात भर देखील पडत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाने रामजन्मभूमी आणि प्राणप्रतिष्ठा ही सामाजिक बांधिलकी आणि स्वयंस्फूर्तीने करून दाखविली आणि ती सिद्ध देखील केली. खुप वर्षे खरोखरच अखंड भारत तयार व्हावा हीच जनसामान्यांच्या मनात भावना असते ती पुढेही कायम असेल कारण एक कुटुंब एक पद्धती ही आपल्याच संस्कृतीने आपल्या सोबत दिलेली शिदोरी आहेत. मात्र अशा स्वरूपाच्या काही महत्वाच्या घटना राजकीय वातावरणातून घडतात त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील विविध अँगल घेत असतो. असो…

नाशिक मध्ये पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा कायापालट होतो आहेत ही सुद्धा आनांदाची गोष्ट च म्हणावी लागेल.पंतप्रधान मोदी यांच्या अवघ्या अडीच तासांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय, राज्याची तसेच पालिकेची यंत्रणा न त्यांच्या स्वागताला जुंपली आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा करीत नाशिकला सजविण्याचे आदेश दिले. त्यानंतर केवळ पंतप्रधानांच्या आगमनाचा मार्ग व तपोवनातील कार्यक्रमस्थळासह संपूर्ण शहरच सजविले जात आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व। खातेप्रमुखांना जबाबदाऱ्यांचे वाटप करीत दोन दिवसात सर्व कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटमच दिला आहे. यामुळे मोदींचा हा दौरा म्हणजे नाशिककरांसाठी उत्सव ठरणार आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हट्ट धरल्यानंतर निलगिरी बाग ते तपोवनातील  कार्यक्रम स्थळादरम्यान पंतप्रधान  मोदींचा रोड शो असणार आहे. त्यामुळे हा रस्ता फुलांनी सजविला जाणार आहे.

असे असले तरी निसर्गाच्या सानिध्यात असणारे युथ लवर्स म्हणून ओळख असणारे पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशकात दाखल होणार आहेत. त्यामुळे साधु संतांच्या पावन भुमित युवा महोत्सव आणि राजकीय – सामाजिक सूत्रे इथूनच पक्के होतील.अशी खात्रीशीर आशा आहेत त्यामुळेच  निसर्गाने देखील  नाशिक ला स्वच्छ करण्यासाठी १० जानेवारी च्या सूर्योदयापूर्वीच रिमझीम सुरू करून साधारण अर्धा तास पाऊस पाडून महापालिकेला देखील आधार दिला आहेत. त्यामुळे अतिरिक्त प्रमाणात तयार झालेले धुळीचे कण देखील संपुष्टात आल्याने निसर्गाने देखील मोदीजींच्या स्वागतासाठी तयारीच केली असेच म्हणावे लागेल.

योगेश रोकडे  निवासी संपादक  ९४२२८९२१९८

COMMENTS