Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न

राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बीड जिल्ह्यातील 2550 प्रकरणे निकाली

बीड प्रतिनिधी - मा.राज्य विधी सेवप्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशानुसार मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाल

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात सापडले मोबाईल
लॉजवर देह व्यापार, दोन महिलांची सुटका| DAINIK LOKMNTHAN
शिर्डीत 125 किलोचा बजरंग उचलण्याची स्पर्धा उत्साहात

बीड प्रतिनिधी – मा.राज्य विधी सेवप्राधिकरणमुंबई यांच्या निर्देशानुसार मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 30 एप्रिल 2023  रोजी जिल्हा न्यायालय , बीड व सर्व तालुका न्यायालयांमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , बीड यांच्यावतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी 2550 प्रकरणे  तडजोडीने निकाली काढण्यात आली व एकूण 13 कोटी 25 लाख 75 हजार 199 रुपयांची तडजोड करण्यात आली. बीड जिल्हा न्यायालयाचे मा. श्री. हेमंत शं.महाजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीडयांनी  आप – आपसातील वाद- तंटे सामोपचाराने  व सामंजस्याने मिळवावीततसेच या राष्ट्रीय लोकन्यायालयातठेवलेली जास्तीत जास्त प्रकरणे  तडजोडीने मिटवावीत असे आवाहन केले होते. त्यानुसार या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये बीड जिल्हात एकूण प्रलंबित 287 85 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी  1351 प्रकरणेनिकाली निघाली आहेत. तसेच दाखल पूर्व 24973 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1199 प्रकरणी निकाली निघाली आहेत. असे एकूण 2550 प्रकरणेनिकाली निघाली आहेत. प्रलंबित प्रकरणात 11 कोटी 43 लाख 42 हजार 590 रुपये व दाखल पूर्व प्रकरणात 1 कोटी 82 लाख 32 हजार 609 रुपये असे या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकूण रक्कम 13 कोटी 25 लाख 75 हजार 199 रुपयाची तडजोड करण्यात आली . तसेच दिनांक 25, 26, 27, 28 व 29 एप्रिल 2023 रोजी झालेल्या स्पेशल ड्राइव्हमध्ये एकूण 594 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 507 प्रकरणेनिकाली निघाली आहेत. सदरील राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास मा. न्यायीक अधिकारी,  मा. कौटुंबिक न्यायालयाचे  मा. न्यायाधीश, कर्मचारी मा. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग बीड, सुरक्षा/ पोलीस अधिकारी/ कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी, बँकाचे, पतसंस्थेचे, विमा कंपनीचे ,अधिकारी/ कर्मचारी स्वच्छता कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी व इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक सौ. संगीता देशपांडे, श्री .एस. पी .झेंड अधीक्षक, श्री .बी.बी. झंवर,  अधीक्षक,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड व सर्व न्यायालयातील न्यायीककर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या सर्वांचे आभार मा. श्री. एस.एन. गोडबोले,   सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीडयांनी मानले.

COMMENTS