Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक हादरलं, नवविवाहितेवर भोंदूबाबाकडून बलात्कार

नाशिक प्रतिनिधी - नाशिकला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. नवविवाहितेवर एका भोंदूबाबाने बलात्कार केला. महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी करण्

खोट्या सह्या प्रकरणी मनसे रायगड जिल्हा महिला अध्यक्षांवर गुन्हा दाखल  
वेश्यांसाठी आलेल्या अनुदानात अपहार ; नगरच्या प्रसिद्ध संस्थेविरोधात तक्रार
प्रवीण दरेकरांनी सांगितलं… मुख्यमंत्री का म्हणाले भावी सहकारी…

नाशिक प्रतिनिधी – नाशिकला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे. नवविवाहितेवर एका भोंदूबाबाने बलात्कार केला. महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी करण्यासाठी कठोर कायदे करुनही अजूनही असे धक्कादायक प्रकार सुरुच आहेत. नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेवर एका भोंदूबाबाने उपचाराच्या नावाखाली बलात्कार केला. नाशिकच्या वडाळा गाव येथील मेहबुबनगरात ही घडली घटना आहे. पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. म्हणून उपचार करण्यासाठी तिला भोंदूबाबाकडे नेण्यात आलं. आरोपी भोंदूबाबाने तिला भूतबाधा झाल्याच सांगितलं.

पीडित महिलेच नुकतच लग्न झालं होतं. तिला पोटदुखीचा त्रास सुरु झालेला. म्हणून शुक्रवारी सासरकडच्या मंडळींच्या सल्ल्याने ती उपचारासाठी वडाळा गावातील हकीम हुसन यासीम शेखकडे गेली होती. यावेळी आरोपी हुसन यासीम शेखने पीडित महिलेला भूतबाधा झाल्याच सांगितलं.

जीवे मारण्याची धमकी – त्याने पीडित महिलेला गुंगीच औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी हुसन यासीम शेखने, अत्याचार केल्यानंतर पीडितेला या बद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. इंदिरानगर पोलिसांनी संशयित आरोपी हुसन यासीम शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. त्याला 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीही संशयिताविरुद्ध एक गुन्हा नोंद असल्याची महिती आहे.

COMMENTS