Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक लोकसभेची रंगत आणि संगत उमेदवार शिंदे गटाचा मात्र पसंती भाजपची ? 

नाशिक - भारतीय निवडणुक आयोगाने जसे लोकसभेचे बिगुल जाहीर केल्याने देशासह राज्यात आज रोजी आणि उद्या देखील उमदे कार्यकर्ते आपले नशीब अजमावयाला बाहे

सिव्हिल’मधील आगीच्या घटनेचा तपास झाला ठप्प
कोल्हे गटाने चर्चेत वेळ न घालवता, विकासकामे तातडीने सुरु करावी : विरेन बोरावके
किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

नाशिक – भारतीय निवडणुक आयोगाने जसे लोकसभेचे बिगुल जाहीर केल्याने देशासह राज्यात आज रोजी आणि उद्या देखील उमदे कार्यकर्ते आपले नशीब अजमावयाला बाहेर पडले आहेत.त्यामुळे २०२४ ची लोकसभा कायम लक्षात राहील असे वातावरण तयार झाले आहेत. क्षणोक्षणी वेगवेगळ्या प्रांतातून निरनिराळ्या बातम्या वा सोसिअल मीडिया द्वारे खबरी येत आहेत.त्यामुळे आमची नाशिक लोकसभा ही काही महत्वाची व निर्णायक ठरणार असल्याचे लक्षात येते आहेत. खुप काही गुढ यावेळी बघण्यास मिळणार आहेत.त्यामुळे नाशिककरांना एक चांगली नामी संधी देखील आहेत की आपला योग्य उमेदवार कोण? अजूनही वेळ गेली नाहीत त्यामुळे मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो. आपले मत किती बहुमुल्य आहेत हे निवडणुका जवळजवळ आल्या की लक्षात येते. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून मिनिटांत काही वेगवेगळ्या बातम्या समोर आल्याने नाशिक लोकसभेची रंगत आणि संगत अजून वाढत चाललेली आहेत.

भाजप सेना युतीच्या काळात नाशिक लोकसभा ही शिवसेना पक्षाला होती मात्र ह्या वेळेस भाजपा , राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्यांचे दोन उपपक्ष शिंदे गट व पवार गट यामुळे भाजपने अतिशय सावध भूमिका घेतल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. अबकी बार ४०० पार म्हणवणारे सरकार कुठल्या पद्धतीने सेनेला तिकिटं देण्यात धन्यता मानत असणार ? 

मात्र असे असले तरी भारतीय जनता पक्ष हा मुळपिंड असलेला दांडगा पक्ष म्हणून त्याने आपली बैठक भारतीय राजकारणात पक्की केली आहेत. त्यामुळे ऐरे गैरे नथु खैरे ही पद्धत आता चालतांना दिसत नाहीत. म्हणूनच आज रोजी इतर राजकीय पक्षांची झोप उडाल्याची चित्रे समोर दिसत आहेत. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच असा राजकीय गोलाकार क्षण नाशिककर अनुभवणार आहेत. भाजपने ठरवले असले तरी जुना काळ एकदमच विसरून चालणार नसल्याने प्रत्येकपक्ष आपली भुमिका अगदी सावधगिरीने घेतांना लक्षात येत आहेत आणि ते त्यांच्या हिताचे देखील आहेत असे म्हणणे काही चुकीचे ठरणार  नाहीत. 

दोन दिवसांपासून स्वामी शांतिगिरी चर्चेत आहेत त्यांची मूळची भूमिका ही भाजपवर्णीय असली तरी त्यांना  लोकसभेसाठी शिंदे गटाकडे का जावे लागते ? भाजप देखील आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने शांतिगिरी यांचा राजकीय लोभ वाढत चालला की काय असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. शिंदे गटाकडे एवढा मोठा बाहुबली खासदार (गोडसे) असतांना शिंदे गटाने स्वामी शांतिगिरी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रंगत संगत वाढत चालल्याने स्वामी शांतिगिरी महाराज हे आपल्या हाताने नुकसान तर करून घेत नाहीत ना ? हाच मोठा यक्ष प्रश्न भारतीय राजकारणातील बाहुबली पक्ष भाजपा यांनी हेरला असून त्यामुळे स्वामी शांतिगिरी यांना देखील तिकीट भेटत नाही तोपर्यंत दुटप्पी भूमिका पार पाडावी लागत आहेत. चाणक्य नितीप्रमाणे दुटप्पी भूमिका आजच्या काळात कुठली भूमिका निभावतें हे शांतिगिरी महाराजांच्या रूपाने पुढे लक्षात येईलच. मात्र असे असले तरी शांतिगिरी यांनी सुरू केलेला प्रचार आणि प्रसार संगतीत बसणाऱ्या खासदाराला डोके दुःखी ठरत आहेत. त्यामुळे नाशिक लोकसभा ही वेगळी ओळख निर्माण करेल यात काही शंका नाहीत. 

म्हणूनच स्वामी शांतिगिरी यांनी सध्या तरी कुठल्याही पक्षाकडून न लढता सावधगिरीने अपक्ष म्हणून लढवून निवडणूक जिंकावी आणि मनात असलेल्या भाजपात सहज प्रवेश करावा यात तरी काही गैर असण्याचे वा वाटण्याचे कारण नाहीत. 

COMMENTS