Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नार्वेकर दुसर्‍यांदा विधानसभा अध्यक्ष !

मुंबई : विधिमंडळ प्रक्रियेत विधानसभा अध्यक्षपद अतिशय महत्वाचे असून, या पदाचे महत्व शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वच

स्थानिक विक्रेत्यांकडूनच खरेदी करा ः चैतालीताई काळे
 माझा घातपात नसुन अपघात होता – आ.बच्चू कडू  
सिंधुदुर्ग, कोल्हापुरानंतर तिसऱ्या जिल्ह्यातही गौतमीला नो एन्ट्री!

मुंबई : विधिमंडळ प्रक्रियेत विधानसभा अध्यक्षपद अतिशय महत्वाचे असून, या पदाचे महत्व शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वच पक्षांच्या लक्षात आले. त्यामुळे या महत्वाच्या पदावर पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत रविवारी दुपारी बारावाजेपर्यंत होती. आणि यावेळेत केवळ एकमेव अर्ज राहुल नार्वेकर यांचा आल्यामुळे ते दुसर्‍यांदा विधानसभा अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी रविवारी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते. महायुतीकडे असलेल्या प्रचंड संख्याबळामुळे नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. नार्वेकर सलग दुसर्‍यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होतील. राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांची ही इच्छा अधुरीच राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला. मित्रपक्षांसह महायुतीचं संख्याबळ 236 इतके झाले आहे. महायुतीकडे मोठे संख्याबळ असल्याने विधानसभा अध्यक्ष तीन पक्षांमध्ये कुणाकडे जाणार याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा भाजपकडे जाणार आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार हे निश्‍चित झाले आहे.

COMMENTS