Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’ जल्लोषात; विवेक कोल्हेंसह  हजारों भाविकांची उपस्थिती

कोपरगाव : नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठातील संतांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेली ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’ उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पंचक्रोशीसह नाशिक व मालेगाव परिसरातील हजारो भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. साईबाबा कॉर्नर येथून प्रारंभ झालेली ही दिंडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमात पोहोचली. संपूर्ण मार्गावर मंगल वाद्यांच्या गजरात व भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात दिंडीचे स्वागत करण्यात आले. या दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांची उपस्थिती ठरली. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या संतांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या वतीने पूजन व स्वागत करण्यात आले. यावेळी पायी नर्मदा परिक्रमा करणारे संत निजानंद महाराज, संत अशोक महाराज, संत सार्थकानंद महाराज, अथर्वानंद महाराज, सुनील महाराज यांच्यासह अनेक संत व साधकांचा सन्मान करण्यात आला. तसेच रामेश्वरी माई, ज्ञानेश्वरी माई, स्वरूपा माई, तपस्विनी माई आदी साध्वींचाही गौरव करण्यात आला. या मंगल प्रसंगी नर्मदा मातेचे जलपूजन करून संतांवर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमास आत्मा मालिक ध्यानपीठाचे ज्येष्ठ संत परमानंद महाराज, संत शांतिमाई, स्मृतिमाई, ध्यानीमाई, संत चांगदेव महाराज, विष्णुदास महाराज, प्रेमानंद महाराज, दत्तगिरी महाराज तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते. यावेळी बोलताना संत परमानंद महाराज यांनी विवेक कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक करत युवकांना दिशा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख केला. अध्यात्मिक उर्जेच्या बळावर समाजकार्य अधिक प्रभावीपणे घडते, असे त्यांनी सांगितले. विवेक कोल्हे यांनीही यावेळी भावना व्यक्त करत, नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या संतांचे स्वागत करताना कोपरगावकरांना अभिमान वाटत असल्याचे सांगितले. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने परिसर पावन झाला असून संतांच्या सहवासातून जीवनात संकटांशी लढण्याची शक्ती मिळते, असे त्यांनी नमूद केले.

विकासकामे रखडल्याने प्र. १४ मध्ये अपघात : लहिरे
कोपरगावात सुशोभीकरण कामांचे लोकार्पण; ‘नमामी गोदावरी’सह विविध नामफलकांची उभारणी
‘गुरुराज’ तर्फे सुरळीत गॅस पुरवठा : जगताप

कोपरगाव : नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठातील संतांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेली ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’ उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. पंचक्रोशीसह नाशिक व मालेगाव परिसरातील हजारो भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

साईबाबा कॉर्नर येथून प्रारंभ झालेली ही दिंडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमात पोहोचली. संपूर्ण मार्गावर मंगल वाद्यांच्या गजरात व भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात दिंडीचे स्वागत करण्यात आले.

या दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांची उपस्थिती ठरली. त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या संतांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या वतीने पूजन व स्वागत करण्यात आले.

यावेळी पायी नर्मदा परिक्रमा करणारे संत निजानंद महाराज, संत अशोक महाराज, संत सार्थकानंद महाराज, अथर्वानंद महाराज, सुनील महाराज यांच्यासह अनेक संत व साधकांचा सन्मान करण्यात आला. तसेच रामेश्वरी माई, ज्ञानेश्वरी माई, स्वरूपा माई, तपस्विनी माई आदी साध्वींचाही गौरव करण्यात आला.

या मंगल प्रसंगी नर्मदा मातेचे जलपूजन करून संतांवर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यक्रमास आत्मा मालिक ध्यानपीठाचे ज्येष्ठ संत परमानंद महाराज, संत शांतिमाई, स्मृतिमाई, ध्यानीमाई, संत चांगदेव महाराज, विष्णुदास महाराज, प्रेमानंद महाराज, दत्तगिरी महाराज तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते.

यावेळी बोलताना संत परमानंद महाराज यांनी विवेक कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक करत युवकांना दिशा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा उल्लेख केला. अध्यात्मिक उर्जेच्या बळावर समाजकार्य अधिक प्रभावीपणे घडते, असे त्यांनी सांगितले.

विवेक कोल्हे यांनीही यावेळी भावना व्यक्त करत, नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या संतांचे स्वागत करताना कोपरगावकरांना अभिमान वाटत असल्याचे सांगितले. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने परिसर पावन झाला असून संतांच्या सहवासातून जीवनात संकटांशी लढण्याची शक्ती मिळते, असे त्यांनी नमूद केले.

COMMENTS