Homeताज्या बातम्यादेश

नरेंद्र मोदी आज तिसर्‍यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

शपथविधीमुळे राजधानीत पोलिसांचा चोख बंदोबस्त

नवी दिल्ली ः भाजप नेते नरेंद्र मोदी आज रविवारी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यादृष्टीने सुरक्षा दलाकडून चोख बंदोबस्त राजधानीत ठेवण

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा
वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला जाणार
भारत सेमी कंडक्टरमुळे ग्लोबल हब बनेल

नवी दिल्ली ः भाजप नेते नरेंद्र मोदी आज रविवारी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यादृष्टीने सुरक्षा दलाकडून चोख बंदोबस्त राजधानीत ठेवण्यात आला आहे. रविवारी 9 जून रोजी संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. तसेच या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबरोबरच या सोहळ्यादरम्यान शहराला नो फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस यासाठी तयारी करत आहेत. दुपारी 2 नंतर राष्ट्रपती भवन आणि परिसरात नियंत्रण क्षेत्र तयार केले जाईल. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात अनेक स्तरांवर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय उंच इमारतींवर एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर तैनात करण्यात येणार आहेत. अनेक परदेशी पाहुणेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण राजधानी हाय अलर्टवर असेल. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही गुप्तचर यंत्रणांच्या खांद्यावर असेल. प्रत्येक राज्यप्रमुखांच्या प्रोटोकॉलनुसार कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय ज्या हॉटेलमध्ये परदेशी पाहुणे राहतील त्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद मार्ग, रफी मार्ग, रायसीना रोड, राजेंद्र प्रसाद रोड, मदर तेरेसा क्रिसेंट, राष्ट्रपती भवनाभोवती सरदार पटेल मार्गावरील कार्यक्रमादरम्यान, ज्या वाहनांकडे पास असेल त्यांनाच प्रवेश दिला जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमावर 500 हून अधिक सीसीटीव्हींच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

राजधानीत कलम 144 लागू, नो फ्लाइंग झोन घोषित – शपथविधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्ली पोलिसांनी 9 आणि 10 जूनसाठी अनेक निर्बंधही लादले आहेत. दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. या कालावधीत पॅराग्लायडर, पॅरा-मोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोट कंट्रोल्ड एअरक्राफ्ट यांसारख्या उप-पारंपारिक हवाई प्लॅटफॉर्मवर संपूर्ण दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी राष्ट्रपती भवन आणि परिसरात संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

महाराष्ट्रातील 5 जणांना मिळणार संधी – सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींसोबत महाराष्ट्रातील 5 खासदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात भाजप खासदार नितीन गडकरी, नारायण राणे व पियूष गोयल यांची नावे चर्चेत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून खासदार संदिपान भुमरे व प्रतापराव जाधव यांच्या नावांवर विचार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार सुनील तटकरे किंवा राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्याही नावाचा मंत्रिपदासाठी विचार सुरू आहे.

COMMENTS