नांदेड प्रतिनिधी - क्षेत्रिय कार्यालय क्रमांक 3 अंतर्गत डॉ. आंबेडकर नगर, जयभिम नगर, जनता कॉलणी, मखदुम नगर, नवी आबादी आदी भागांत घाणीचे साम्राज्

नांदेड प्रतिनिधी – क्षेत्रिय कार्यालय क्रमांक 3 अंतर्गत डॉ. आंबेडकर नगर, जयभिम नगर, जनता कॉलणी, मखदुम नगर, नवी आबादी आदी भागांत घाणीचे साम्राज्य पसरले असून लहान मुलांमध्ये तापीचे प्रमाण वाढले आहे तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नालितून काढून रस्त्यावर टाकलेली घान,कचरा बेंदाड जैसे थे वैसे अवस्थेत ठेवल्यामुळे दुर्गधी वाढली आहे. या प्रभागातील पिण्याच्या पाण्यासाठी दलित योजनेअंतर्गत पिवळी गिरणी येथे जलकुंभ बांधण्यात आली आहे. या जलकुंभाची निर्मिती दलित वस्त्यांसाठी पाणीपुरवठा करणे होय ,जय भीम नगर आंबेडकर नगर , श्रावस्ती नगर व अन्य दलित वस्त्यांसाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा असे नियोजन करण्यात आले होते. मात्र राजकीय वाढल्यामुळे दलित वस्त्यांची कामे इतर वस्त्यांत करण्यात आल्याप्रमाणे या सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहतीवर अन्याय करण्यास आला आहे पाण्याची पाईप लाईन मी झाल्यामुळे अनेक ठिकाणी कुजून गेली आहे .त्यात नालीचे घाण पाणी जाऊन नळांना दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पूर्वी अनेक अनेक वसाहतीय वसाहती मध्ये जाऊन पाण्याची परीक्षण केल्या जात होते त्यासाठी दर दिवशी पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही हे प्रयोगशाळेत शाळेत तपाणीसाठी पाठवले जात होते परंतु सध्या हा प्रकार बंद झाला आहे. या भागात दिवशी दिवस घाणीचे साम्राज्य वाढत असल्यामुळे आणि रस्ते अरुंद झाल्यामुळे चालणेही अवघड झाले आहे. तेंव्हा यास जबाबदार असणारे स्वच्छता, इतर कर्मचारी व नागरिकांशी उध्दटपणे वागणारे सफाई कामगार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आहे .क्षेत्रिय आधिकारी झोन क्रमांक 3 लेबर कॉलणी, नांदेड यांना निवेदन व्दारे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
COMMENTS