नगरपंचायत कार्यालयाबाहेर आंदोलन कर्जत : कर्जत शहराचे नाव संत सद्गुरु गोदड महाराज नगर असे करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमव

नगरपंचायत कार्यालयाबाहेर आंदोलन
कर्जत : कर्जत शहराचे नाव संत सद्गुरु गोदड महाराज नगर असे करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने कर्जत नगरपंचायत कार्यालयाबाहेर प्रदेश प्रवक्ता नगरसेवक अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष अनिल समुद्र, शेतमजूर वृद्ध भूमी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, अमोल क्षीरसागर, चांगदेव सरोदे, तुकाराम पवार, लखन पारसे, पार्वती भोसले, रंगिशा काळे, रवींद्र काळे, शीतल काळे, धावडे, सोनू भिसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनाची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सचिन घुले पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपस्थित नगरसेवक व आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना सचिन घुले पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या संत सद्गुरु गोदड महाराज यांचे नाव कर्जत शहराला देण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निश्चितच पुढाकार घेण्यात येईल.
यावेळी बोलताना अरुण जाधव म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी पक्ष सातत्याने दलित, शोषित, पीडित जनतेसाठी काम करत आहे. कर्जत ही संतांची भूमी असून, थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांचे नाव कर्जत शहराला देणे ही आमची प्रमुख मागणी आहे. वंचित बहुजन आघाडी जेव्हा आंदोलन करते, तेव्हा प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेत नाही असे अरुण जाधव म्हणाले.
यावेळी आंदोलकांच्या वतीने सोमनाथ भैलुमे, अनिल समुद्र, तुकाराम पवार,अमोल शिरसागर, चांगदेव सरोदे यांची भाषणे झाली. पाणीपुरवठा विभागाचे सभापती उपगटनेते सतीश पाटील यांनी नगरपंचायतीच्या वतीने आंदोलकांशी सविस्तर चर्चा करून सर्व मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच कर्जत शहरातील अनेक वर्षांपासून राजीव गांधी नगर, अक्काबाई नगर यासह इतर परिसरातील नागरिकांच्या घरांचा प्रलंबित असणारा प्रश्न विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, प्रवीण घुले पाटील, सचिन घुले, नगराध्यक्ष रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे व सर्व नगरसेवक यांच्या पुढाकारातून सोडवला आहे असे सांगितले. यावेळी नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, रवींद्र सुपेकर तसेच नगरपंचायतचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS