Homeताज्या बातम्यादेश

नायब सिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यंमत्री

मनोहरलाल खट्टर यांनी दिला होता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

चंदीगड ः हरियाणा राज्यात मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडण

पिंपरीत भाजपच्या नगरसेवकाला अटक l DAINIK LOKMNTHAN
पळणारे तीन आरोपी पकडले…त्यांच्याकडे तीन गावठी कट्टे सापडले
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

चंदीगड ः हरियाणा राज्यात मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यासाठी काही तासांचा अवधी असतांना हरियाणामध्ये मंगळवारी राजकीय भूकंप घडला. भाजपचे मुख्यमंत्री असलेले मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खट्टर यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यानंतर आता नायब सिंह सैनी यांचा शपथविधी राजभवनात संपन्न झाला.
खट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या आणि हरियाणा भाजपाचे प्रभारी बिप्लब देव यांच्या उपस्थितीत नायब सिंह सैनी यांची एकमताने विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजप आणि जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आधी मंत्रीमंडळ विस्तार व नंतर लोकसभेसाठीचे जागावाटप यावरून टोकाचा विसंवाद झाल्याचे सांगितले जात आहे. खट्टर यांच्या मंत्रिमंडळात 14 मंत्री होते. जननायक जनता पार्टीकडून उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह तीन मंत्री होते. खट्टर यांच्यासह त्यांनीही राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला. मात्र त्यापूर्वी मनोहर लाल खट्टर व त्यांच्या मंत्र्यांनी सकाळी त्यांच्या पदाचा राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे हरियाणा मंत्रीमंडळाचा विस्तार बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. भाजप व जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आधी मंत्रीमंडळ विस्तार व नंतर लोकसभेसाठीच जागावाटप यावरून टोकाचा विसंवाद झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजप व जननायक जनता पार्टी या दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकासाठीच्या जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला होता. यासंदर्भात जननायक जनता पार्टीचे नेते व उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली असता त्यावेळी त्यांना हरियाणामध्ये एकही जागा दिली जाणार नसल्याचे सांगण्याच आल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जननायक जनता पार्टी दोन जागांची मागणी असताना भाजपने मात्र सर्व 10 जागा लढवण्याची तयारी केली आहे. हरियाणाच्या विधानसभेतील 90 जागांपैकी भाजपकडे 41 जागा आहेत. जननायक जनता पक्ष आणि अपक्षाच्या पाठिंब्यावर तिथे भाजपने सत्ता स्थापन केली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जननायक जनता पार्टी यांच्यात मतभेद निर्माण झाले. 2019 च्या निवडणुकीत भाजपने राज्यातील लोकसभेच्या सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे जननायक जनता पार्टी फारसे काही देण्याची भाजपची तयारी नव्हती. त्यातून मतभेद वाढले आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर राजीनाम्याची वेळ आली आहे. हरियाणा लोकहित पक्षाचे आमदार गोपाल कांडा यांनी भाजप आणि जननायक जनता पार्टी यांच्यातील युती तुटण्याच्या टप्प्यावर असल्याची शक्यता वर्तवली होती.

पक्षीय बलाबल – विधानसभेत 41 आमदार, 5 अपक्ष आमदार आणि हरयाणा लोकहित पक्षाचे आमदार गोपाल कांडा यांचा पाठिंबा असल्याने हरयाणात भाजपचे सरकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत झाले होते. केवळ जननायक जनता पार्टीशी काडीमोड घेण्यासाठी हा राजकीय भूकंप झाल्याचे बोलले जात आहे. अपक्ष आमदार नयनपाल रावत, धर्मपाल गोंडर यांनी भाजप सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.

COMMENTS