Homeताज्या बातम्यादेश

नायब सैनी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

पंचकुला : हरियाणात भाजपने तिसर्‍यांदा सत्ता मिळवल्यानंतर गुरूवारी नायब सैनी यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दसरा मैदा

अध्यक्ष पदासाठी कॅंग्रेसचे ओबीसी कार्ड !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी दिला चोप l LOKNews24
शेवगाव-पाथर्डी तालुक्याने मतदानाद्वारे भरभरुन प्रेम दिले : मोनिका राजळे

पंचकुला : हरियाणात भाजपने तिसर्‍यांदा सत्ता मिळवल्यानंतर गुरूवारी नायब सैनी यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. नायब सैनी यांच्यासह 13 आमदारांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये अनिल विज, श्याम सिंह राणा, महिपाल धांडा, कृष्ण लाल पनवार, अरविंद शर्मा, रणबीर सिंग गंगवा, आरती राव, श्रुती चौधरी, राव नरबीर सिंग, विपुल गोयल, राजेश नागर गुर्जर, गौरव गौतम आणि कृष्ण कुमार बेदी यांचा समावेश आहे.

COMMENTS