श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांचा नोंदीच्या सर्व ऊसाचे गाळ
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी:– सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांचा नोंदीच्या सर्व ऊसाचे गाळप पूर्ण झाल्याने कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस व संचालक मंडळ सदस्यांच्या हस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून चालू सन 2023-24 या 49 व्या गळीत हंगामाची सांगता रविवार ता. 24 रोजी दुपारी 4 वाजता अत्यंत साध्या पध्दतीने करणेत आली.
यावेळी माहिती देताना कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सतिष जांभळे यांनी सांगितले की, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व सर्व संचालक मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऊस तोड मजूरांच्या मोठ्या अडचणीवर मात करुन हा हंगाम यशस्वीरित्या संपन्न होत आहे. सन 2023-24 गळीत हंगामाकरीता कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांचा नोंदलेला सुमारे 7803 हेक्टर तसेच गेटकेनमधील 1530 हेक्टर अशी 9333 हेक्टर क्षेत्राची नोंद होती. तथापि. त्यातील काही ऊसाची अन्यत्र विल्हेवाट लागली गेल्यामुळे कारखान्यास 5,85,368 मे.टन ऊस उपलब्ध झाला असून त्यापासुन 6,34,425 क्विंटल साखर उत्पादीत केलेली आहे. यावर्षीचा सरासरी साखर उतारा 10.92 टक्के इतका मिळालेला आहे. सहवीज निर्मीती प्रकल्पामधून 4,69,84,900 युनिट वीज निर्मीती झाली असुन त्यापैकी 2,79,82,782 युनिट वीज निर्यात करणेत आलेली आहे. तसेच आसवनी प्रकल्पामधुन 20,55,421 ब.लि. रेक्टीफाईड स्पिरीट उत्पादन झालेले आहे. त्याकरीता 7,631.078 मे.टन मळीचा वापर करणेत आला असुन सरासरी उतारा 269.32 ब.लि./मे.टन असा मिळालेला आहे. कारखान्याने गाळप केलेल्या ऊसाचे दि. 15.2.2024 अखेर प्र.मे.टन रु. 2700/-प्रमाणे पेंमेंट अदा केलेले आहे. उर्वरीत पेमेंट लवकरच अदा करणेत येणार आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कामगार उपस्थित होते.
COMMENTS