Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड जेरबंद ; फहीम खानवर हिंसाचाराचा ठपका

नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात झालेली दंगल पूर्वनियोजित होती. तसेच मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फईम शमीम खान या दंगलीचा मास्

जावयाकडून सासूची हत्या, पत्नीवर हल्ला
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
शरद पोंक्षे अभिनेता म्हणून टुकार, पण माणूस म्हणूनही नीच

नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात झालेली दंगल पूर्वनियोजित होती. तसेच मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फईम शमीम खान या दंगलीचा मास्टर माईंड असल्याची माहिती पोलिसांच्या एफआयआरमधून पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फईम याला बुधवारी अटक केली आहे.
नागपुरातील दंगल पूर्वनियोजित असल्याच्या विधानाला पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी देखील दुजोरा दिला आहे.आरोपी फईम शमीम खान हा या हिंसाचाराचा प्रमुख आरोपी आहे. फईम व्यतिरीक्त पोलिसांनी 51 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रमुख आरोपी फईम यानेच 17 मार्च रोजी घटनेच्या दिवशी सकाळी11 वाजता 30 ते 40 जणांचा जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला. यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात आरोप फहीम खानने पोलिसांकडे केला. यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतरदेखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि शिवाजी चौकात येऊन तणाव निर्माण करण्यास सुरुवात केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नागपूर येथील हिंसाचारप्रकरणात थेट पोलिस उपायुक्तावर कुर्‍हाडीने हल्ला करण्याचा प्रकार, तसेच अनेक घरांवर दगडफेक आणि जाळपोळ करण्याच्या घटना घडल्या होत्या, यात 33 पोलिस कर्मचारी जखमी झाली होते, याप्रकरणत पोलिसांनी 38 वर्षीय फहीम खान नामक व्यक्तीवर जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवत त्याला अटक केली आहे.

नागपुरात काही भागात अजूनही संचारबंदी लागू
नागपूर शहरातील झोन क्रमांक 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेत.

COMMENTS