Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती निकृष्ट पद्धतीने

राहुरी फँक्टरीच्या वृद्धाचा निष्पाप बळी

देवळाली प्रवरा ः अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर सेल पेट्रोल पंपानजीक इर्टीगा कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघात

स्कूल बस आणि गाडीचा अपघात.
जामखेड-आष्टी रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार
भीषण अपघात ! वारकऱ्यांची ट्रक झाली पलटी

देवळाली प्रवरा ः अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गावर सेल पेट्रोल पंपानजीक इर्टीगा कार व दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे(वय-61) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी सकाळी घडली आहे.
               शिर्डीकडून शनिशिंगणापूरकडे परराज्यातील भाविक घेऊन चाललेल्या एम एच 20 एफ जी-7027 या इर्टीगा कारने फॅक्टरीकरून लोणीकडे जनावरांच्या बाजारासाठी हिरो होंडा पॅशन क्रमांक एमएच 17 ए एस -1622 या दुचाकीस जोराची धडकी दिली. या धडकेत दुचाकीचालक राहुरी फॅक्टरी वृंदावन कॉलनी जवळील आरंगळे वस्तीवरील रहिवासी रंगनाथ गंगाधर आरंगळे(वय-61) यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे(राहुरी फॅक्टरी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी शहरातील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहेत. अपघातानंतर ईर्टीगा कारने तीन ते चार पलटी मारल्या. या ईर्टीगा कारमधील उडीसा राज्यातील सुस्मिता संतोष पुष्टी (वय-46) हे जखमी असून त्यांच्यावर राहुरीत लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे व पप्पू कांबळे यांच्या मदतीने रंगनाथ आरंगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात तसेच जखमींना राहुरीत उपचाराठी नेले. अपघातस्थळी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकोन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राहुरी फॅक्टरी येथील मयत रंगनाथ आरंगळे यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कामासाठी ठिकठिकाणी एक बाजूला रस्ता खोदला असून एकेरी वाहतूक सूरु आहे. नगर-मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथगतीने व निकृष्ट पद्धतीने सूरु आहे. दुरुस्त केलेल्या रस्त्यावर पहिल्याच पावसाने ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या रस्त्यावर अनेक निष्पाप बळी गेले असून आणखी किती बळी हा रस्ता घेणार असा सवाल युवा नेते सुजित सुरेश वाबळे यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS