अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणु
अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, बाळासाहेब कोळेकर यांच्या संकल्पनेतून 1 मे-महाराष्ट्रदिनी शाळांमध्ये शैक्षणिक निकाल घेण्यासाठी आलेल्या पालकांमध्ये मतदार जनजागृती व्हावी म्हणून अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने शिक्षक, कलाशिक्षक व कलाकारांसाठी; माझी लोकशाही-माझा फळा; या फलकलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
माझा भारत-माझं मत, 13 मे रोजी मतदान कराच,अहमदनगर-शिर्डीच्या मतदार राजा जागा हो 13 मे रोजी मतदानाचा धागा हो यापैकी एका विषयावर आकर्षक व संकल्पनायुक्त फलकलेखन करावयाचे असून शाळा , शासकीय कार्यालये ,धार्मिक स्थळे,चौकातील फळे,नोटीस-सूचनाफलक आदी फलकांचा वापर करता येईल. आकर्षक रंगसंगतीच्या फलकलेखनाबरोबरच फलक आरेखन व सजावट देखील स्पर्धक करू शकतात तसेच मतदानाची 13 मे 2024 ही तारीख व स्वतःचे नाव फलकावर येणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक व माध्यमिक विभाग मिळून सहा क्रमांकासह एकूण 45 विजेते घोषित केले जाणार आहेत. शक्य झाल्यास नागरिक, ग्रामस्थ, पालक-शिक्षक यांच्याबरोबर फलकासह फोटो घेऊन आपापल्या सोशल मीडियावर र्ीींशशरिहाशवपरसरी या हॅशटॅगसह अपलोड देखील करावेत.एका स्पर्धकास अनेक फलकलेखन करता येतील. सहभागी होणार्या स्पर्धकांनी फलकलेखनाचे उत्कृष्ट फोटो देशातील पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या 9002 10 9003 या व्हाट्सअप क्रमांकावर स्वतःचे संपूर्ण नाव,शाळेचे नाव,पत्ता फोन नंबरसह 10 मे 2024 पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त शिक्षक, कलाशिक्षक व कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन असे आवाहन राहुल पाटील (उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी), अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी), मीना शिवगुंडे (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), आकाश दरेकर (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी) प्रदीप पाटील (तहसीलदार-निवडणूक), बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी), डॉ.अमोल बागुल(जिल्हा मतदारदूत), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार) व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे.
COMMENTS