Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरात मुस्लिम समाज आक्रमक

महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने उमटले प्रतिसाद

राहाता ः सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचना दरम्यान मुस्लिम धर्माविषयी केलेल्या  वक्तव्याने

अहमदनगर : पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाचे धरणे आंदोलन
जीवनात कितीही संकटे आली तरी, श्रद्धा कायम ठेवा ः श्री भास्करगिरीजी महाराज
मनपा निवडणुकीची काँग्रेसने सुरू केली आतापासून तयारी

राहाता ः सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचना दरम्यान मुस्लिम धर्माविषयी केलेल्या  वक्तव्याने  मुस्लिम समाज नाराज झाला. महंत रामगिरी यांच्या प्रवचनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा मुस्लिम समाजाने आरोप केला आहे. या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. यावेळी मुस्लिम समाजाचे मौलाना यांनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा इथून पुढे कुठल्याही  दोन समाजामध्ये तेड, तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल करावा. इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेले आहे अशा मोहंमद पैगंबर यांची जीवनावर चारित्र्य हनन करणारी वक्तव्य केले. असे एक वा अनेक विधाने करुन मुस्लिम समाजच् धार्मिक भावना विनाकारण दुखावल्या त्यामुळे मुस्लिम समाजाचे मन दुखावले असून महंत रामगिरी महाराज यांचेवर कडक कारवाई करुन भारतीय न्याय संहितेचे कलम अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने मौलाना यांनी केली. यावेळी मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान अफवांवर विश्‍वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका, नागरिकांनी शांतता राखावी त्याचबरोबर अफवा पसरवणारे, प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करु नये. असे आवाहन डी.वाय.एस.पी. शिरीष ओमने यांनी नागरिकांना केले आहे. तसेच असे चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणार्‍या दोन्ही समाजातील समाजकंटकांवर  कारवाई करण्यात येईल. धार्मिक भावना दुखावणे अंतर्गत या विवध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.

COMMENTS