देवगाव शिवारात तरुणाचा खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवगाव शिवारात तरुणाचा खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील शेंडीकडे जाणार्‍या 27 वर्षीय तरुणास दोघांनी रस्त्यात अडवून त्यास बेदम मारहाण करून देवगाव शिवारात या तरुणाची हत्

व्यंगचित्र हा मानवी मनाचा आरसा – अरविंद गाडेकर
आम्ही श्रेयवादाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो ः मा.आ. कोल्हे
परमार्थात कान तर संसारात डोळे उघडे ठेवले पाहिजे ः हभप अरूण महाराज

अहमदनगर/प्रतिनिधी : अकोले तालुक्यातील शेंडीकडे जाणार्‍या 27 वर्षीय तरुणास दोघांनी रस्त्यात अडवून त्यास बेदम मारहाण करून देवगाव शिवारात या तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. योगेश भास्कर भालेराव (वय 27) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. योगेश भास्कर भालेराव (वय 27) हा शेंडीला जात असताना त्याला रस्त्यात अडवून रमेश दत्तू जाधव व मधुकर दत्तू जाधव यांनी देवगाव शिवारात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी मृत मुलाचे वडील भास्कर संतू भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत भा.द.वि.कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजूर पोलिस करीत आहे. या खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

COMMENTS