Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

कृत्रिम तलावांची यादी मिळणार गुगल मॅपवर

मुंबई : मुंबई महानगरातील यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी  बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने विवि

राज्यात गणेशोत्सवादरम्यान 16 भक्तांचा मृत्यू
यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?
पुण्यातील गणेशोत्सवावर 1800 ‘सीसीटीव्ही’ कॅमर्‍यांची नजर

मुंबई : मुंबई महानगरातील यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी  बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने विविधस्तरीय उपक्रम राबवित असते. याच उपक्रमांचा भाग म्हणून श्रीगणेश मूर्ती घडविणार्‍या मूर्तिकांराना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने श्रीगणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करणे यासारखे विविध उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतले आहेत. याच शृखंलेत यंदा नागरिकांना त्यांच्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती सहजपणे उपलब्ण व्हावी, या उद्देशाने सदर तलावांची यादी गुगल मॅप्सवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
 बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या अशा विविध बाबींची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व्हावी व मंडळांना त्यांच्या सूचना थेट महानगरपालिका प्रशासनाकडे मांडता याव्यात, या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समन्वय बैठकीचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या निर्देशांनुसार यंदाच्या गणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. आज आयोजित बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्यासह मुंबई पोलीस दलाच्या प्रतिनिधी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी, तसेच महानगरपालिकेचे विविध खात्यांचे व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकार्‍यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली.

COMMENTS