पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणूक लढवणार : सागर राठोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणूक लढवणार : सागर राठोड

अभिजित खंडागळे/पाथर्डी : आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना सर्व जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सागर राठोड यांनी त्यांच्या

शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज – अक्षय वाकचौरे
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी
संस्कृती परंपरेचा वारसा जपण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले

अभिजित खंडागळे/पाथर्डी : आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना सर्व जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सागर राठोड यांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,शिवसेना व पक्षश्रेष्ठींचा जसा आदेश राहील.त्या पध्दतीने पाथर्डी शहराची नगरपालिका निवडणूक लढवली जाईल.जो पर्यत पक्ष निर्णय घेत नाही.तोपर्यंत स्थानिक पातळवीर कोणी काही भाष्य करू नये तसेच परस्पर निर्णय घेऊ नये.निवडणूक स्वबळावर लढवायची की महाविकास आघाडी राहील हा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जाईल अशा सूचना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी व पक्षश्रेष्ठीं कडून शहरप्रमुख राठोड यांना देण्यात आल्या आहेत. आगामी पालिका निवडणूकीमध्ये प्रत्येक प्रभागात शिवसेनेचा उमेदवार तयार आहे.

COMMENTS